पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्केचअप मध्ये सेलेक्शन मार्की

इमेज
आज आपण स्केचअप मधील सेलेक्शन टूल वापरून एखादे ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा काहील भाग कसा सेलेक्ट करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग पाहू.

स्केचअप मध्ये मेजरमेंट

इमेज
स्केचअप मध्ये एखादे  ड्रॉइंग  काढताना त्याचे मेजरमेंट टाईप करून एन्टर करण्याची सोय आहे.   ड्रॉइंग  टूल अॅक्टिव्ह असताना त्याचे  मेजरमेंट तुम्ही कीबोर्डवर टाईप करू शकता. 

स्केचअप मध्ये व्ह्यूज टूलबार

इमेज
स्केचअप मध्ये 3D मॉडेल बनवताना तुम्हाला त्याला एका ठराविक अँगल  मधून पाहण्याची आवश्यकता भासते. ओर्बिट टूलने हे करण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे पटकन वेगवेगळ्या  अँगलने मॉडेल पाहता यावे म्हणून स्केचअप मध्ये एक टूल बार आहे. हे टूलबार दिसण्यासाठी View - Toolbars या ठिकाणी क्लिक करा.

स्केचअप मध्ये ग्रुप आणि कॉम्पोनंट

इमेज
स्केचअपमध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही ड्रॉइंग टूल वापरता तेव्हा त्याला एडिट करताना तुम्हाला त्याला सेलेक्ट करावे लागले तर तुमच्या लक्षात येईल कि तुम्ही एखाद्या ऑब्जेक्ट वर क्लिक केल्यास, ज्या ठिकाणी तुम्ही क्लिक केले असेल त्यानुसार एखादी लाईन, एखादा फेस सेलेक्ट होतो. डबल क्लिक केल्यास ती लाईन किंवा फेस आणि त्याला जोडलेले फेस किंवा लाईन्स सेलेक्ट होतात आणि ट्रिपल क्लिक केल्यास पूर्ण मॉडेल सेलेक्ट होते 

स्केचअपचे बेसिक्स

इमेज
आज आपण स्केचअप हाताळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती घेऊ. तुम्ही हे वाचण्यापूर्वी स्केचअप डाउनलोड आणि इंस्टॉल केला असेलच. तसेच स्केचअपच्या मेनू आणि टूलबारबद्दल वाचले असेलच. नसेल तर या पेजवर जाऊन सुरवातीचे आर्टिकल वाचा. 

स्केचअपचे ऑफसेट टूल

इमेज
स्केचअपचे एक महत्वाचे टूल आहे ऑफसेट टूल. या ठिकाणी ऑफसेट म्हणजे एखाद्या लाईन, लाईन्स किंवा कर्व्हपासून ठराविक अंतरावर काढलेली किंवा काढलेल्या रेषा. 

स्केचअपसाठी राउंड कॉर्नर प्लगइन

इमेज
आज आपण स्केचअपसाठी राउंड कॉर्नर या नावाच्या प्लगइन बद्दल माहिती घेऊ. हा प्लगइन फ्रेडो 6 असे टोपण नाव असलेल्या डेव्हलपरने बनवला आहे.  हा प्लगइन तुम्ही स्केचअपमध्ये स्केचुकेशनच्या एक्सटेन्शन स्टोअरमधून इंस्टॉल करू शकता. 

स्केचअपसाठी व्हिजुहोल हे प्लग इन

इमेज
व्हिजुहोल हे प्लग इन फ्रेडो 6 या डेव्हलपरने बनवलेले आहे. या प्लग इन चा वापर करून तुम्हाला कुठल्याही आकृतीवर ड्रील, स्टँप , कार्व्ह, आणि एम्बॉस करता येऊ शकते. स्केचअपच्या बिल्ट इन टूल्स मध्ये पुश पुल टूल चा वापर होल बनवण्यासाठी होतो पण जे केवळ एकसंध असलेल्या आकृतींवरच करता येते, एखाद्या इंजिनच्या मॉडेलमध्ये तुम्हाला मॉडेलच्या वेगवेगळ्या भागांमधून जर ड्रील करायचे असेल तर पुश पुल टूलने हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सरफेसवर वेगवेगळे होल काढावे लागतात. तसेच पुश पुल टूल कर्व्हड सरफेसवर चालत नाही. या सर्व अडचणीमुळे तुम्हाला अशा कामांसाठी व्हिजुहोल हे प्लग इन वापरता येते.  

स्केचअपसाठी वर्क प्लेन प्लगइन कसा इंस्टॉल करावा

इमेज
या आर्टिकल मध्ये आपण स्केचअप साठी वर्क प्लेन या नावाचे प्लग इन इंस्टॉल करून पाहू. स्केचअप मध्ये को-प्लेनार ड्रॉइंग काढण्यासाठी या प्लग-इन चा वापर होतो.  हे प्लग इन आपल्याला स्केचुकेशनच्या प्लग इन स्टोअर मधून इंस्टॉल करावे लागते. तुम्ही जर स्केचुकेशनचे प्लग इन स्टोअर  इंस्टॉल केले नसेल तर या लिंक वर तुम्हाला याची माहिती मिळेल.

स्केचअपसाठी स्केचुकेशनचे प्लगइन स्टोअर

इमेज
या आर्टिकलमध्ये आपण  Sketchucation.com या वेबसाइट वर मिळणाऱ्या स्केचअपसाठी च्या प्लगइन स्टोअरला कसे इंस्टॉल करावे हे पाहू.  Sketchucation.com या वेबसाइटवर स्केचअपसाठी विनामूल्य प्लगइन्स मिळतात, जे स्केचअपच्या बिल्ट-इन एक्सटेंशन वेअर हाउस मध्ये मिळत नाहीत. आपल्याला ते एक्सटेंशंस स्केचुकेशनच्या  प्लगइन स्टोर मधूनच इंस्टॉल करावे लागतात. हे प्लग इन  स्केचुकेशनच्या वेबसाईटवरून वेगवेगळे डाऊनलोड करून पण इंस्टॉल करता येतात, पण स्केचअप प्रोग्राम मधूनच इंस्टॉल करण्यासाठी त्यांचे प्लग इन स्टोर डाऊनलोड करता येते. 

स्केचअप मध्ये को-प्लेनार ड्रॉइंग

इमेज
आज आपण स्केचअप वापरताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्यावर असलेल्या उपायावर विचार करू. स्केचअप वापरताना येणारी पहिली अडचण म्हणजे को-प्लेनार ड्रॉइंग करता न येणे. जेव्हा आपण  स्केचअपमध्ये लाईन टूल, फ्री हँड टूल, किंवा आर्क टूल वापरून बरीचशी  ड्रॉइंग करू पाहतो तेव्हा ही  ड्रॉइंग्स एकाच प्लेन मध्ये राहातील याची शाश्वती नसते. उदाहरणादाखल खालील ड्रॉइंग पहा.

स्केचअपच्या कर्व्ही लॉफ्ट प्लग-इन मध्ये स्प्लाइन कर्व्हचा उपयोग

इमेज
आज आपण  स्केचअपच्या कर्व्ही लॉफ्ट प्लग इन मध्ये स्प्लाइन कर्व्हचा उपयोग पाहू. कर्व्ही लॉफ्ट हे एक विनामूल्य प्लग इन आहे. हे प्लग इन तुम्ही खालील लिंकवरून डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता. http://sketchucation.com/plugin/1175-curviloft हे प्लग इन  इंस्टॉल करण्यापूर्वी तुम्हाला sketchucation.com या वेबसाईटवर एक अकाउंट उघडावे लागते. हे विनामूल्य आहे.  कर्व्ही लॉफ्ट प्लग इन मध्ये बरेचसे टूल्स आहेत. आपण त्यातील  स्प्लाइन कर्व्हची माहिती घेऊ. 

स्केचअपमध्ये वेगवेगळे आकार - तंबू 1

इमेज
आज आपण स्केच अप वापरून एक तंबूची आकृती कशी बनवावी हे पाहू. स्केचप मध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. या लेखामध्ये आपण एका पद्धतीचा वापर करू, आणि यापुढील लेखांमध्ये दुसऱ्या पद्धतींचा वापर शिकू. यासाठी आपण पहिल्यांदा सर्कल टूलचा वापर करून एक वर्तूळ  काढू.

स्केचअपमध्ये हौद कसा बनवावा

इमेज
वर दिसत असलेल्या मॉडेल वर क्लिक करून तुम्ही त्याला फिरवून पाहू शकता. आज आपण असेच एक मॉडेल ( पाण्याचा हौद ) बनवू .  पहिल्यांदा स्केचअप चा प्रोग्राम उघडा. त्यामध्ये डिफाल्ट टेम्पलेट ( सिम्पल) तसाच राहू द्या. 

स्केचअप मधील आर्क टूल

इमेज
आज आपण स्केचअपमधील आर्क टूलचा उपयोग कसा करावा हे पाहू. आर्क टूल तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने उघडू शकता. तुमच्या टूल बार मध्ये आर्क टूलचा आइकॉन दिसत असेल तर त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन चार आइकॉन दिसतील. 

स्केचअप मधील टूलबार

इमेज
स्केचअप जेव्हा तुम्ही वापरायला सुरवात करता ( म्हणजे जेव्हा स्केचअप प्रो चे ट्रायल एडिशन संपून फ्री एडिशनची सुरवात होते ) त्यावेळी तुम्हाला स्केचअपच्या विंडोमध्ये एक टूलबार दिसतो. या टूलबारला "गेटिंग स्टार्टेड" हे नाव आहे. 

स्केचअप मधील मेनू ऑप्शंस

इमेज
मागील पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे जर तुम्ही गूगल स्केचअप 2015 डाउनलोड करून इंस्टाल केला असेल तर तुम्हाला एक महिन्यासाठी स्केचअप चे प्रो व्हर्जन वापरायला मिळते. एका महिन्यानंतर प्रो व्हर्जन बंद होतो आणि फ्री व्हर्जन ला सुरवात होते. आपण जी माहिती घेणार आहोत ती सर्व फ्री व्हर्जन बद्दलच असेल. या  फ्री व्हर्जन ला कोठलीही काल मर्यादा नाही.     येथील चित्रामध्ये स्केचअपचे विंडोज 10 च्या डेस्कटॉप वर दिसत असलेले आईकॉन दिसते . यावर डबल क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होते.

स्केचअप डाउनलोड कसा करावा

इमेज
गूगल स्केचअप या नावाने जाणले जाणारे सॉफ्टवेअर हे 3D मॉडेलिंग साठी वापरले जाणारे लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. याचे प्रोफेशनल आणि विनामूल्य असे दोन प्रकार आहेत. तुम्ही शैक्षणिक आणि वैयक्तिक कामासाठी हे सॉफ्टवेअर विनामूल्य डाउनलोड करू शकता. आज आपण हे सॉफ्टवेअर कसे आणि कोठून डाउनलोड करावे हे पाहू. हे सॉफ्टवेअर आपण  http://www.sketchup.com/  या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.  वरील वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे डाउनलोड बटण दिसेल. त्यावर क्लिक करा .

Puralax अॅँड्रॉइड फोनसाठी पझल गेम

इमेज
Puralax हा अॅँड्रॉइड फोनसाठी एक पझल गेम आहे. या गेम मध्ये तुम्हाला सारे ब्लॉक्स एकाच रंगामध्ये रंगवायचे असतात. यामध्ये सहा स्टेजेस असून प्रत्येक स्टेज मध्ये वीस लेवल्स आहेत. हा गेम इंस्टॉल करण्यासाठी प्रथम तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये "Puralax" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.