स्केचअपमध्ये हौद कसा बनवावा


वर दिसत असलेल्या मॉडेल वर क्लिक करून तुम्ही त्याला फिरवून पाहू शकता. आज आपण असेच एक मॉडेल ( पाण्याचा हौद ) बनवू . 
पहिल्यांदा स्केचअप चा प्रोग्राम उघडा. त्यामध्ये डिफाल्ट टेम्पलेट ( सिम्पल) तसाच राहू द्या. 

आता रेक्टँगल टूल निवडा. आणि एक चौकोन काढा. आपल्याला सराव करण्यासाठी हे करायचे आहे. तुम्हाला वाटेल त्या आकाराचा काढा.




यानंतर पुश पुल टूल निवडा. किंवा कीबोर्ड वर P दाबा. आता चौकोनाच्या पृष्ठभागावर माउस चे पॉइंटर नेऊन क्लिक करा आणि त्याला वरील बाजूस ओढा. 


यानंतर ओर्बिट टूल चा वापर करून मॉडेलचा अँगल तुमच्याकडे फिरवून घ्या, आणि ऑफसेट टूल चा वापर करून आतील बाजूस एक बाऊंडरी ओढून घ्या  


 आता परत पुश पुल टूल वापरून चौकोनाचा आतील भाग खालील बाजूस ढकला

आता हौदाच्या कोणत्याही एका बाजूस एक चौकोन बनवा. हा चौकोन हौदाच्या तळाच्या खाली असावा. आणि तो ब्लॉक च्या खालील लेवल पासून सुरु व्हावा. त्यानंतर या चौकोनाला पुश पुल टूल वापरून आतमध्ये  ढकला. आता तुमचे मॉडेल असे दिसेल.

आता Windows > materials हा मेनू उघडून हौदाला हवा तो रंग द्या 


स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.

टिप्पण्या