स्केचअपमध्ये वेगवेगळे आकार - तंबू 1

आज आपण स्केच अप वापरून एक तंबूची आकृती कशी बनवावी हे पाहू. स्केचप मध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. या लेखामध्ये आपण एका पद्धतीचा वापर करू, आणि यापुढील लेखांमध्ये दुसऱ्या पद्धतींचा वापर शिकू. यासाठी आपण पहिल्यांदा सर्कल टूलचा वापर करून एक वर्तूळ  काढू.यानंतर या वर्तुळाच्या पृष्ठभागावर वर्तुळाच्या सेंटर आणि सर्कमफरंसला स्पर्श करणारी एक रेघ काढा, आणि सेंटर पासून 90 डिग्रीच्या कोणाने एक रेघ काढा, आणि त्यानंतर त्यांना जोडा, यामुळे एक त्रिकोणी आकृती तयार होईल. 


यानंतर या त्रिकोणी आकृतीवर टू पॉइंट आर्क टूल निवडून एक आर्क काढा. 


यानंतर या आर्कच्या समोरील लाईन डिलीट करा. त्यानंतर फॉलो-मी टूल वापरून या आकाराला वर्तुळाच्या परीघावर फिरवा. 

त्याने वरील चित्रात दिसत असलेली आकृती तयार  होईल. आता या चित्राला हव्या त्या रंगाने रंगवा (Windows - materials )  

टिप्पण्या