स्केचअपच्या कर्व्ही लॉफ्ट प्लग-इन मध्ये स्प्लाइन कर्व्हचा उपयोग

आज आपण  स्केचअपच्या कर्व्ही लॉफ्ट प्लग इन मध्ये स्प्लाइन कर्व्हचा उपयोग पाहू. कर्व्ही लॉफ्ट हे एक विनामूल्य प्लग इन आहे. हे प्लग इन तुम्ही खालील लिंकवरून डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता.

http://sketchucation.com/plugin/1175-curviloft

हे प्लग इन इंस्टॉल करण्यापूर्वी तुम्हाला sketchucation.com या वेबसाईटवर एक अकाउंट उघडावे लागते. हे विनामूल्य आहे. कर्व्ही लॉफ्ट प्लग इन मध्ये बरेचसे टूल्स आहेत. आपण त्यातील स्प्लाइन कर्व्हची माहिती घेऊ. 


या टूलचा वापर करून आपण वेगवेगळ्या आकाराचे पृष्ठभाग बनवू शकतो. पृष्ठभागाला आकार देण्यासाठी तुम्ही एकमेकाशी सलग असलेल्या कोणत्याही प्रकारच्या आकारांचा उपयोग करू शकता. हे आकार म्हणजे आर्क्स, कर्व्हस, सर्कल, स्क़ेअर किंवा इतर कसल्याही आकारांना एकमेकाशी जोडून एक थ्री-डायमेनशनल पृष्ठभाग बनवता येतो.वरील चित्रामध्ये एकाच आकाराचे चौकोन ( स्क़ेअर ) वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्यांना कर्व्ही लॉफ्ट प्लग इन मध्ये स्प्लाइन कर्व्हने जोडून पृष्ठ भाग बनवला आहे. ही पद्धत इमारतींच्या एअर कंडीशनिंग डक्टचे मॉडेल बनविण्यासाठी वापरली जावू शकते.
  वरील आकृतीमध्ये वेगवेगळ्या अंतरावर ठेवलेल्या आर्कना जोडून एक पृष्ठभाग बनवला आहे. वरील आकृतीमध्ये वेगवेगळी वर्तुळे एकमेकापासून दूर ठेवून त्यांना जोडून 3D आकार बनवला आहे. पाईपलाईनचे मॉडेल बनवण्यासाठी याचा वापर केला जावू शकतो. 

हे प्लग इन कसे वापरता येते हे दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.तुम्ही हे वाचले आहे काय?

स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.

टिप्पण्या