स्केचअपसाठी व्हिजुहोल हे प्लग इन

व्हिजुहोल हे प्लग इन फ्रेडो 6 या डेव्हलपरने बनवलेले आहे. या प्लग इन चा वापर करून तुम्हाला कुठल्याही आकृतीवर ड्रील, स्टँप , कार्व्ह, आणि एम्बॉस करता येऊ शकते. स्केचअपच्या बिल्ट इन टूल्स मध्ये पुश पुल टूल चा वापर होल बनवण्यासाठी होतो पण जे केवळ एकसंध असलेल्या आकृतींवरच करता येते, एखाद्या इंजिनच्या मॉडेलमध्ये तुम्हाला मॉडेलच्या वेगवेगळ्या भागांमधून जर ड्रील करायचे असेल तर पुश पुल टूलने हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सरफेसवर वेगवेगळे होल काढावे लागतात. तसेच पुश पुल टूल कर्व्हड सरफेसवर चालत नाही. या सर्व अडचणीमुळे तुम्हाला अशा कामांसाठी व्हिजुहोल हे प्लग इन वापरता येते.  

स्केचअपमध्ये स्केचुकेशनच्या एक्सटेन्शन स्टोअरमध्ये तुम्हाला "Visuhole" हे प्लग इन आढळून येईल. त्या समोरील लाल रंगाच्या बटनावर क्लिक करून तुम्ही त्याला इंस्टॉल करू शकता.
एकदा इंस्टॉल झाल्यावर टूल्स मेनू मध्ये फ्रेडो 6 कलेक्शन या मेनूमध्ये तुम्हाला व्हिजुहोलचा मेनू ऑप्शन दिसेल.

तसेच स्केचअप च्या स्क्रीन वर त्याचा एक छोटासा फ्लोटिंग टूल बार दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तो एक्सपांड होतो.
टूलबारच्या सुरवातीला तुम्हाला स्टेन्सिल सेलेक्ट करता येते. त्याठिकाणी दिसणाऱ्या अॅरोवर क्लिक केल्यास तुमच्या माउस पॉइंटरचा आकार बदलतो, आणि तुम्हाला या पॉइंटरने ज्या आकाराचे तुम्हाला होल पाहिजे त्यावर क्लिक करावे लागते.  तुम्हाला हा आकार पूर्वीच काढून ठेवावा लागतो. आणि त्या आकाराच्या मध्यभागी क्लिक करावे लागते. 

असे केल्यावर तुमचा आकार पिवळ्या रंगात दिसू लागतो. याला स्टेन्सिल म्हणतात. त्याच बरोबर तुमच्या माउस पॉइंटरच्या टोकावर हा आकार दिसू लागतो. आता तुम्हाला माउस पॉइंटर नेऊन ज्या ठिकाणी तुम्हाला होल पाहिजे तेथे क्लिक करायचे असते. असे केल्यावर तुम्ही क्लिक केलेल्या जागी तसेच त्याला परपेंडीकुलर असलेल्या मॉडेलच्या इतर भागांवर देखील होल्स तयार होतात. हे एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला हे कसे होते याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.  

  

टिप्पण्या