Puralax अॅँड्रॉइड फोनसाठी पझल गेम

Puralax हा अॅँड्रॉइड फोनसाठी एक पझल गेम आहे. या गेम मध्ये तुम्हाला सारे ब्लॉक्स एकाच रंगामध्ये रंगवायचे असतात. यामध्ये सहा स्टेजेस असून प्रत्येक स्टेज मध्ये वीस लेवल्स आहेत.

हा गेम इंस्टॉल करण्यासाठी प्रथम तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर "Play Store" उघडा, त्यानंतर सर्च बॉक्स मध्ये "Puralax" टाईप करून सर्च करा. तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये बरीचशी नावे दिसतील. त्यापैकी खाली दाखवलेल्या नावावर टच करा.या गेमचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो. या ठिकाणी तुम्हाला या गेम बद्दल प्रकाशकाने सांगितलेली माहिती वाचता येईलहा गेम इंस्टॉल करण्यासाठी कोणतीही विशेष परमिशन्स मागत नाही. हा गेम इंस्टाल झाल्यावर त्याचा आयकॉन असा दिसतो


हा गेम स्टार्ट केल्यानंतर त्याचा स्क्रीन असा दिसेल

हा गेम कसा खेळला जातो हे दाखवण्यासाठी मी एक छोटासा व्हिडीओ तयार केला आहे, तो तुम्ही खाली पाहू शकता.
टिप्पण्या