स्केचअपसाठी वर्क प्लेन प्लगइन कसा इंस्टॉल करावा

या आर्टिकल मध्ये आपण स्केचअप साठी वर्क प्लेन या नावाचे प्लग इन इंस्टॉल करून पाहू. स्केचअप मध्ये को-प्लेनार ड्रॉइंग काढण्यासाठी या प्लग-इन चा वापर होतो. 
हे प्लग इन आपल्याला स्केचुकेशनच्या प्लग इन स्टोअर मधून इंस्टॉल करावे लागते. तुम्ही जर स्केचुकेशनचे प्लग इन स्टोअर इंस्टॉल केले नसेल तर या लिंक वर तुम्हाला याची माहिती मिळेल.

पहिल्यांदा स्केचअप प्रोग्राम स्टार्ट करा. त्यानंतर 
Extensions - Sketchucation - Sketchucation Plug in store
हे ऑप्शन निवडा.

यानंतर एक नवीन विंडो उघडेल. त्यामधील सर्च बॉक्स मध्ये "workplane" असे लिहून सर्च करा. तुम्हाला खालील सर्च रिझल्ट्स दिसतील.
 यापैकी (TIG Work Plane) या नावासमोरील ऑटोइंस्टॉल या बटणावर क्लिक करा म्हणजे ते प्लग इन इंस्टॉल होईल.

जर तुम्ही स्केचुकेशनच्या प्लग इन स्टोअरचे  लेटेस्ट व्हर्जन 3 इन्स्टॉल केले असेल तर हा मेनू थोडासा वेगळा दिसतो.
  
या ठिकाणी प्लग इन स्टोअरच्या जागी एक्सटेंशन स्टोअर दिसेल आणि त्याला उघडल्यावर तुम्हाला बऱ्याचश्या गोष्टी वेगळ्या दिसतील.

हे आहे स्केचुकेशनचे नवीन एक्सटेंशन स्टोअर. यामध्ये पूर्वी प्रमाणे सर्च बॉक्स नाही. त्यामुळे तुम्हाला कुठलेही प्लग इन लिस्टमध्ये शोधून  इंस्टॉल करावे लागेल.

जेव्हा एक्सटेंशन स्टोअर उघडतो तेव्हा त्याचे डिफाल्ट लिस्ट  "Recent" असते. तुम्हाला ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करून त्यामधून "Full List" निवडावे लागेल. तेव्हा स्केचुकेशनच्या सर्व अव्हेलेबल प्लगइनची  लिस्ट दिसू लागेल. यामध्ये वर्क प्लेन हे नाव शोधून त्यासमोरील लाल रंगाचे बटन दाबल्यास इंस्टॉलेशनला सुरवात होइल.  

प्लग इन इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला स्केचअपच्या टूल्स मेनू मधे त्याची नोंद झालेली दिसेल.

 

 तर स्केचअप मध्ये अशा रीतीने स्केचुकेशनच्या प्लग इन स्टोअर मधून प्लग इन सर्च आणि इंस्टॉल करता येतो.

तुम्ही हे वाचले आहे काय?


- स्केचअपसाठी स्केचुकेशनचे प्लगइन स्टोअर कसे इंस्टॉल करावे.
- स्केचअपमध्ये वर्क प्लेन या प्लगइनचा वापर कसा करावा  
- गूगल स्केचअप डाउनलोड कसा करावा
- गूगल स्केचअप मध्ये लार्ज टूल सेट कसा इनेबल करावा



स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते. 

टिप्पण्या