स्केचअप मध्ये व्ह्यूज टूलबार

स्केचअप मध्ये 3D मॉडेल बनवताना तुम्हाला त्याला एका ठराविक अँगल  मधून पाहण्याची आवश्यकता भासते. ओर्बिट टूलने हे करण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे पटकन वेगवेगळ्या अँगलने मॉडेल पाहता यावे म्हणून स्केचअप मध्ये एक टूल बार आहे. हे टूलबार दिसण्यासाठी
View - Toolbars या ठिकाणी क्लिक करा.
व त्यामध्ये Views हे ऑप्शन निवडा. असे केल्यास त्याचा टूलबार स्क्रीनवर दिसू लागतो. हा फ्लोटिंग टूलबार आहे. याला तुम्ही दुसऱ्या टूलबार सोबत डॉक देखील करू शकता. यामध्ये दिसणारे आईकॉन हे मॉडेलला वेगवेगळ्या अँगल मधून पाहण्यासाठी मदत करतात.
   

टिप्पण्या