स्केचअप मध्ये ग्रुप आणि कॉम्पोनंट

स्केचअपमध्ये जेव्हा तुम्ही कुठलेही ड्रॉइंग टूल वापरता तेव्हा त्याला एडिट करताना तुम्हाला त्याला सेलेक्ट करावे लागले तर तुमच्या लक्षात येईल कि तुम्ही एखाद्या ऑब्जेक्ट वर क्लिक केल्यास, ज्या ठिकाणी तुम्ही क्लिक केले असेल त्यानुसार एखादी लाईन, एखादा फेस सेलेक्ट होतो. डबल क्लिक केल्यास ती लाईन किंवा फेस आणि त्याला जोडलेले फेस किंवा लाईन्स सेलेक्ट होतात आणि ट्रिपल क्लिक केल्यास पूर्ण मॉडेल सेलेक्ट होते 

मॉडेल बनवताना तुम्ही एक ड्रॉइंग दुसऱ्या ड्रॉइंग जवळ नेले तर ते एकमेकाला चिटकून बसतात, म्हणजे तुम्ही त्यांना वेगवेगळे सेलेक्ट करू शकत नाही किंवा मूव्ह करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मॉडेलचा एखादा भाग वेगळा ड्रॉ करून त्याला मूळ मॉडेलशी जोडायचे असेल तर त्याचा आकार फायनल होईपर्यंत त्याला ग्रुप करून त्यावर काम करणे आवश्यक असते. आकार फायनल झाल्यानंतर तुम्ही त्याला मूळ मॉडेलशी जोडून एक्सप्लोड केल्यास तो मूळ मॉडेल ला चिटकतो.  
   
तुम्हाला रोटेट किंवा मूव्ह किंवा स्केल टूल वापरायचे असेल तर तुम्हाला सम्पूर्ण ऑब्जेक्ट सेलेक्ट करावे लागते. याला उपाय म्हणून स्केचअपमध्ये ग्रुपचे ऑप्शन आहे. पहिल्यांदा एखाद्या ऑब्जेक्टला सेलेक्ट टूलने त्याभोवती स्क़्वेअर काढून, किंवा डबल क्लिक करून सेलेक्ट करा, त्यानंतर त्यावर राईट क्लिक करा. त्यामध्ये ग्रुप आणि कॉम्पोनंट हे ऑप्शंस आहेत. 


ग्रुप बनवल्यास तुम्ही त्या ऑब्जेक्टवर व्यवस्थितपणे काम करू शकता. त्या ऑब्जेक्टला तुम्ही इतर मॉडेल बरोबर परत ग्रुप करू शकता, किंवा तुम्हाला त्याला इतर ऑब्जेक्ट सोबत मर्ज करायचे असेल तर त्याला परत राईट क्लिक करून "एकस्प्लोड" हे ऑप्शन निवडावे. 

कॉम्पोनंट हे ऑप्शन ग्रुप सारखेच आहे पण त्यामध्ये एक विशेषता आहे. सहसा कॉम्पोनंट अशा ऑब्जेक्टचे बनवले जाते ज्याचा तुम्हाला मॉडेल बनवताना वारंवार उपयोग होईल. एखाद्या कॉम्पोनंटच्या कॉपीज करून तुम्ही मॉडल मधे वापरू शकता. आणि जर तुम्ही  कॉम्पोनंटच्या एका कॉपीला एडिट केले, म्हणजे त्याचा आकार बदलला किंवा रंग बदलला तर त्याच्या इतर कॉपीज देखील त्याप्रमाणे बदलतात. या विशेषतेमुळे मॉडेल मधील वारंवार वापरल्या जाणाऱ्या आकारांना कॉम्पोनंट  बनवून वापरता येते. 

टिप्पण्या