स्केचअप मध्ये मेजरमेंट

स्केचअप मध्ये एखादे ड्रॉइंग काढताना त्याचे मेजरमेंट टाईप करून एन्टर करण्याची सोय आहे.  ड्रॉइंग टूल अॅक्टिव्ह असताना त्याचे मेजरमेंट तुम्ही कीबोर्डवर टाईप करू शकता. 


मेजरमेंटचा बॉक्स स्क्रीनच्या खाली उजव्या बाजूला असतो. सुरवातीला त्याच्यासमोर मेजरमेंट्स असे लिहिलेले असते व तुम्ही जे ड्रॉइंग टूल वापरत असाल त्यानुसार या बॉक्स पुढील नावे बदलत जातात. स्केचअप मध्ये स्केच करताना डायमेंशनस टाईप करून भरता येणे हे एक आवश्यक कौशल्य आहे. यासाठी आपण काही टूल्स साठी कुठकुठले नंबर एन्टर करता येतात हे पाहू.

लाईन टूल


वर चित्रात दाखवल्याप्रमाणे लाईन टूल वापरताना Length विचारली जाते, लाईनची प्रत्येक सेगमेंट काढताना तुम्ही त्याची लांबी या ठिकाणी टाईप करून एन्टर करू शकता. येथे 10' म्हणजे दहा फूट असे लिहिलेले आहे. 

आर्क टूल  आर्क काढताना रेडीयस आणि अँगल एन्टर करता येतो

2 Point Arc2 पॉइंट आर्क काढताना लेन्थ (लाम्बी) अणि बल्ज (फुगवटा) एन्टर करता येतो.

Rectangle


चौकोन काढताना त्याच्या दोन्ही बाजूंची लांबी एन्टर करता येते 

Circle


वर्तूळ काढताना स्केचप मध्ये 24 सेगमेंटचा वापर केला जातो. म्हणजे 24 साईडचा पॉलीगॉन काढला जातो. तुम्हाला हवे असल्यास ही संख्या वाढवू शकता. त्यासाठी अंक एकदा लिहून पुढे s लिहावे. म्हणजे तुम्हाला 100 आकडा एन्टर करायचा असेल तर 100s असे लिहावे.
  


त्यानंतर दुसरे माप हे त्रिज्येचे म्हणजे रेडिअसचे. येथे हवा असलेला रेडिअस तुम्ही भरू शकता. 
तर अशा रीतीने इतर ड्रॉइंग टूल वापरताना तुम्हाला प्रत्येक स्टेजवर खालील बॉक्स मधील नावे बदलेली दिसतील, ती पाहून तुम्ही त्यांच्या समोर आवश्यक असलेले मोजमाप लिहू शकता. 

टिप्पण्या