स्केचअप मध्ये सेलेक्शन मार्की

आज आपण स्केचअप मधील सेलेक्शन टूल वापरून एखादे ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा काहील भाग कसा सेलेक्ट करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग पाहू.


स्केचअप मध्ये तुम्हाला वेळोवेळी ड्रॉइंगचा काही भाग सेलेक्ट करावा लागतो. असे करत असताना जर तुम्हाला पूर्ण ड्रॉइंग ऐवजी फक्त त्याचा काही भाग निवडायचा असेल तर त्या भागाभोवती माउस पॉइंटर ने सेलेक्शन मार्की काढता येते. हे सेलेक्शन दोन  प्रकारे करता येते. 

तुम्ही वरून डाव्या बाजूने सुरवात करून खाली उजवीकडे मार्की काढू शकता किंवा खाली उजव्या बाजूने सुरवात करून वर डावीकडे जावू शकता. वरकरणी सारख्याच वाटणाऱ्या या कृती वेगवेगळ्या प्रकारे सेलेक्शन करतात. 

तुम्ही जर वर डावीकडे मार्कीला सुरवात केली असेल तर मार्कीचा चौकोन अखंड दिसतो, आणि या वेळी ज्या बाजू मार्कीच्या बाउंड्री मध्ये पूर्णपणे समाविष्ट आहेत केवळ त्याच बाजू सेलेक्ट  झालेल्या दिसतात. सेलेक्ट  झालेल्या बाजू निळ्या रंगाच्या दिसतील.




आणि जर तुम्ही खालून उजव्या बाजूने मार्कीला सुरवात केली असेल तर मार्की डॉटेड लाईन मध्ये दिसेल आणि या वेळी मार्कीच्या बाउंड्री मध्ये अंशतः समाविष्ट असलेले बाजू देखील सेलेक्ट  केले जातील



टिप्पण्या