यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
http://sketchucation.com/plugin-store-free-download
पेज उघडल्यानंतर "डाऊनलोड नाऊ" या बटणावर क्लिक करा. आणि त्यानंतर डायलॉग बॉक्स मध्ये "सेव्ह" बटणावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्या डाऊनलोड फोल्डर मध्ये वर दिसणारी फाईल सेव्ह झालेली दिसेल.
यानंतर स्केचअपचा प्रोग्राम स्टार्ट करा. त्यामध्ये Windows - Preferences या मेनूवर क्लिक करा. आता तुम्हाला खालील बॉक्स दिसेल.
या बॉक्स मध्ये "Install Extension..." या बटनावर क्लिक करा. तेव्हा एक डायलॉग बॉक्स उघडेल. त्यामध्ये तुम्हाला डाऊनलोड करून ठेवलेली "SketchuCationTools.rbz" ही फाईल सेलेक्ट करावी लागेल. त्यानंतर खालील विंडो दिसेल.
यामध्ये "यस" या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याचे इंस्टॉलेशन पूर्ण होइल. आता तुम्हाला स्केचअपच्या "Extensions" मेनू मध्ये स्केचुकेशन हा मेनू दिसू लागेल.
जर तुम्ही स्केचुकेशनच्या प्लगइन स्टोअरचे लेटेस्ट व्हर्जन 3 इन्स्टॉल केले असेल तर हा मेनू थोडासा वेगळा दिसतो.
या ठिकाणी प्लगइन स्टोअरच्या जागी एक्सटेंशन स्टोअर दिसेल आणि त्याला उघडल्यावर तुम्हाला बऱ्याचश्या गोष्टी वेगळ्या दिसतील.
हे आहे स्केचुकेशनचे नवीन एक्सटेंशन स्टोअर. यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्च बॉक्स नाही. त्यामुळे तुम्हाला कुठलेही प्लगइन लिस्टमध्ये शोधून इंस्टॉल करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही स्केचुकेशनच्या प्लगइन स्टोर/ एक्सटेंशन स्टोअर मधून कुठलेही एक्सटेंशन किंवा प्लग इन शोधून इंस्टॉल करू शकता.
तुम्ही हे वाचले आहे काय?
स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.
कोई टिप्पणी नहीं:
टिप्पणी पोस्ट करें