या ठिकाणी मी लाईन टूल वापरून काही रेषा काढल्या आहेत. या अँगल वरून रेषा काढताना या रेषा एकाच प्लेन मध्ये आहेत की नाहीत हे लक्षात येत नाही. ही स्केचअप वापरताना नेहमी येणारी अडचण आहे.
मी या ड्रॉइंगला अँगल बदलून पाहतो.
http://sketchucation.com/forums/viewtopic.php?t=31204
आज आपण हा मेनू कसा वापरावा याची प्राथमिक माहिती घेऊ.
वरील मेनू मध्ये Workplane - New Plane सेलेक्ट करा. त्यानंतर स्केचअपच्या स्क्रीनवर तुम्हाला हवे तिथे एकदा क्लिक करा. त्यानंतर एक नारंगी रंगाची रेषा दिसेल. ही रेषा तुम्हाला हव्या त्या दिशेने ओढा. रेषेच्या ठराविक लाम्बीनंतर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला या रेषेच्या 90 डिग्री वर एक दुसरी नारंगी रेषा ओढली जात असलेली दिसेल व त्याच बरोबर या दोन्ही रेषा ज्या प्लेन वर आहेत त्या प्लेन वर एक ग्रीड म्हणजे जाळी दिसेल. रेषेच्या ठराविक लाम्बीनंतर एकदा क्लिक केल्यानंतर ही जाळी व रेषा फिक्स होतील. यावेळी कीबोर्डवर टॅब दाबल्यास ही जाळी 90 डिग्रीच्या अँगलने फिरलेली तुम्हाला दिसेल.
तुम्हाला हव्या त्या पोजिशनवर जाळी फिरवून नंतर डबल क्लिक करा म्हणजे जाळी तिथे फिक्स होईल व नारंगी रेषा दिसेनाश्या होतील. आता तुम्ही या जाळीवर जे ड्रॉइंग काढाल ते त्याच प्लेनवर राहील याची खात्री बाळगता येते.
स्केच पूर्ण झाल्यानंतर वर्कप्लेन मेनू मध्ये हाईड-अन हाईड हा मेनू ऑप्शन निवडा म्हणजे ही जाळी दिसेनाशी होईल.
स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.
हे प्लगइन इंस्टाल झाल्यानंतर टूल्स मेनूमध्ये Workplane हा मेनू दिसू लागतो
वरील मेनू मध्ये Workplane - New Plane सेलेक्ट करा. त्यानंतर स्केचअपच्या स्क्रीनवर तुम्हाला हवे तिथे एकदा क्लिक करा. त्यानंतर एक नारंगी रंगाची रेषा दिसेल. ही रेषा तुम्हाला हव्या त्या दिशेने ओढा. रेषेच्या ठराविक लाम्बीनंतर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला या रेषेच्या 90 डिग्री वर एक दुसरी नारंगी रेषा ओढली जात असलेली दिसेल व त्याच बरोबर या दोन्ही रेषा ज्या प्लेन वर आहेत त्या प्लेन वर एक ग्रीड म्हणजे जाळी दिसेल. रेषेच्या ठराविक लाम्बीनंतर एकदा क्लिक केल्यानंतर ही जाळी व रेषा फिक्स होतील. यावेळी कीबोर्डवर टॅब दाबल्यास ही जाळी 90 डिग्रीच्या अँगलने फिरलेली तुम्हाला दिसेल.
तुम्हाला हव्या त्या पोजिशनवर जाळी फिरवून नंतर डबल क्लिक करा म्हणजे जाळी तिथे फिक्स होईल व नारंगी रेषा दिसेनाश्या होतील. आता तुम्ही या जाळीवर जे ड्रॉइंग काढाल ते त्याच प्लेनवर राहील याची खात्री बाळगता येते.
या ग्रीडवर जे ड्रॉइंग काढाल ते पूर्ण झाल्यावर जर क्लोज लूप असेल तर तेथे एक फेस तयार होईल आणि रेषांनी वेढलेला भाग रंगीत झालेला दिसेल.
तुम्ही हे वाचले आहे काय?
स्केचअप मेक हे एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जे आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें