स्केचअप मधील टूलबार
यामध्ये अगदी सुरवातीला तुम्हाला स्केचअप शिकण्यासाठी आवश्यक असलेली टूल्स दाखवलेली आहेत. पण स्केचअपमध्ये याहूनही अधिक टूल्स आहेत, आणि ती तुम्हाला केव्हातरी वापरावी लागतात. ही टूल्स दिसून येण्यासाठी तुम्हाला "लार्ज टूल सेट" या नावाचा टूलबार निवडावा लागतो.
यासाठी पहिल्यांदा मेनूमध्ये view - Toolbars याप्रमाणे क्लिक करा. त्यानंतर टूलबारची एक विंडो उघडेल. त्यामध्ये तुम्हाला वीस नावे दिसतील, यापैकी "लार्ज टूल सेट" या नावासमोर क्लिक करा, त्यानंतर लगेचच तुम्हाला हा टूलबार स्केचअपच्या स्क्रीनवर जोडला गेलेला दिसेल. त्यानंतर "Close" हे बटन दाबा. आता तुम्हाला हा टूलबार स्क्रीनच्या वरील भागात जोडला गेलेला दिसेल. तुम्ही हवे असेल तर त्याला स्क्रीनच्या इतर भागात हलवू शकता. त्यासाठी टूलबारच्या डाव्या बाजूस तीन ठिपके दिसतील त्या ठिकाणी माउस पॉइंटर नेऊन त्याला ड्रॅग करून तुम्ही त्याला इतरत्र हलवू शकता.
स्केचअप मेक हा एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जो आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन, इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा