स्केचअप डाउनलोड कसा करावा

गूगल स्केचअप या नावाने जाणले जाणारे सॉफ्टवेअर हे 3D मॉडेलिंग साठी वापरले जाणारे लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. याचे प्रोफेशनल आणि विनामूल्य असे दोन प्रकार आहेत. तुम्ही शैक्षणिक आणि वैयक्तिक कामासाठी हे सॉफ्टवेअर विनामूल्य डाउनलोड करू शकता.

आज आपण हे सॉफ्टवेअर कसे आणि कोठून डाउनलोड करावे हे पाहू.

हे सॉफ्टवेअर आपण http://www.sketchup.com/ या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता. 
वरील वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे डाउनलोड बटण दिसेल. त्यावर क्लिक करा .



त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल 

यामध्ये "प्रोफेशनल वर्क" साठी तुम्हाला स्केचअप विकत घ्यावा लागेल. त्यामुळे आपण "पर्सनल प्रोजेक्ट्स" निवडू. तुम्ही जर शिकत असाल किंवा शिकवत असाल तर "एजुकेशनल युज" निवडू शकता. 
प्रत्येक पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी माहिती विचारली जाते. ती खालीलप्रमाणे.



तुम्हाला डाउनलोड करताना स्केचअप प्रो 2015 चा ट्रायल व्हर्जन किंवा स्केचअप मेक निवडावा लागतो. ट्रायल व्हर्जन 30 दिवसानंतर बंद पडतो, त्यानंतर तुम्ही "स्केचअप मेक" फ्री व्हर्जन वापरणे चालू ठेवू शकता. 
मी या सिरीज मध्ये स्केचअप मेक फ्री व्हर्जनचा वापर करून 3D मॉडेलिंग कसे करावे याबद्दल माहिती देईन.

या पुढील माहिती - 



स्केचअप मेक हा एक विनामूल्य 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे जो आर्किटेक्चर, कंस्ट्रक्शन,  इंटीरियर आणि फर्नीचर इत्यादींचे मॉडेल्स बनवण्यासाठी वापरता येतो.

टिप्पण्या