Learn Python programming in Marathi - Part1
आजपासून आपण पायथॉन प्रोग्रामिंग शिकू. पायथॉन ही सर्वात सोपी प्रोग्रामिंग लँगवेज समजली जाते. मोटर सायकल किंवा कार चालवण्यासाठी त्याच्या इंजिनियरिंगची माहिती असणे आवश्यक नसते, प्रोग्रामिंग ज्या पद्धतीने शिकवले जाते त्यामुळे ते विनाकारण क्लिष्ट वाटू लागते. यासाठी आपण पायथॉन प्रोग्रामिंग सोप्या रीतीने शिकण्याचा प्रयत्न करू.
प्रत्येक आर्टिकल सोबत एक व्हिडिओ पण असेल ज्याचे लिंक तुम्हाला या लेखाच्या शेवटी मिळेल. दरम्यान तुम्हाला पायथॉन प्रोग्रामिंग संबंधी प्रश्न असतील तर कॉमेन्ट मध्ये विचारू शकता
तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर पायथॉनचे सॉफ्टवेअर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.
https://www.python.org/downloads/
यापूर्वी तुम्ही जर एखादे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले असेल तर हे इंस्टॉल करणे तुम्हाला जड जाणार नाही.
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोग्राम ओपन करण्यासाठी विंडोजच्या मेनू मध्ये P च्या खाली पहा.
येथे IDLE (Python..) वर क्लिक केल्यानंतर एक विंडो उघडेल. त्याला Python Shell म्हणतात. सुरवातीला आपण प्रोग्रमिंग शिकण्यासाठी याचाच वापर करू.
जेव्हा हा विंडो ओपन होईल तेव्हा विंडोच्या टास्कबार मध्ये त्याचे आइकॉन दिसू लागेल. त्या आइकॉनवर राईट क्लिक केल्यास तुम्हाला "Pin to taskbar" दिसू लागेल. त्यावर क्लिक केल्यावर हा आइकॉन कायम स्वरूपी टास्कबार मध्ये दिसू लागेल. असे झाल्यास तुम्हाला हा प्रोग्राम वेळोवेळी ओपन करणे सोपे होईल.
याशिवाय तुम्ही याच्या आइकॉनचे शॉर्टकट डेस्कटॉप देखील बनवू शकता. यासाठी मेनू मधून त्याच्या आइकॉनला डेस्कटॉपवर ड्रॅग आणि ड्रॉप करावे.
या शिवाय तुम्ही हा सॉफ्टवेअर इंस्टाल न करता देखील ब्राउजर मध्ये पायथॉनचा कम्पाईलर वापरू शकता.
तुम्हाला हवे असल्यास edit on Repl.it या ठिकाणी क्लिक केल्यास एका नव्या विंडो मध्ये त्याचे कम्पाइलर उघडेल.
तुम्ही येथे कोड एडिट करून प्रोग्राम च्या आउटपुट मध्ये होणारा बदल रन करून पाहू शकता.
तुम्ही कोड एडिट करण्याचा प्रयत्न सुरु केल्यास तुम्हाला कोड ला फोर्क करण्या विषयी मेसेज दिसेल.
तुम्हाला या कोड मध्ये केलेला बदल सेव्ह करून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचे एक अकाउंट या वेबसाइट वर उघडावे लागेल. अन्यथा Cancel वर क्लिक केल्यास तो मेसेज निघून जाईल आणि तुम्ही कोड एडीट करून त्याला रन करून पाहू शकता, त्यासाठी अकाउंट उघडण्याची गरज नसते.
तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा स्मार्टफोन वर पायथॉन चे सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्या शिवाय केवळ ब्राउजर मध्ये ऑनलाइन कम्पाइलर वापरून पायथॉन प्रोग्रामिंग शिकू शकता.
Learn Python in Marathi - Part 2

- कॉमेंट च्या सुरवातीला # हॅश लिहिणे आवश्यक आहे
- प्रिंट print स्टेटमेंट नंतर ( ) दोन ब्रॅकेट द्यावे
- ( ) ब्रॅकेट मध्ये दोन ' ' सिंगल कोट किंवा " " डबल कोट लिहून, मेसेज त्यामध्ये लिहावा
- टायपिंग पूर्ण झाल्यानंतर त्रिकोणी अॅरो वर क्लिक करावे म्हणजे तुम्हाला प्रोग्रामचे आउटपुट दिसेल
हा एक ऑनलाइन कम्पाइलर आहे. येथे तुम्हाला कोड लिहिलेले दिसेल आणि रन बटनावर क्लिक केल्यास त्याचा रिझल्ट खाली दिसेल.
तुम्हाला हवे असल्यास edit on Repl.it या ठिकाणी क्लिक केल्यास एका नव्या विंडो मध्ये त्याचे कम्पाइलर उघडेल.
तुम्ही येथे कोड एडिट करून प्रोग्राम च्या आउटपुट मध्ये होणारा बदल रन करून पाहू शकता.
तुम्ही कोड एडिट करण्याचा प्रयत्न सुरु केल्यास तुम्हाला कोड ला फोर्क करण्या विषयी मेसेज दिसेल.
तुम्हाला या कोड मध्ये केलेला बदल सेव्ह करून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचे एक अकाउंट या वेबसाइट वर उघडावे लागेल. अन्यथा Cancel वर क्लिक केल्यास तो मेसेज निघून जाईल आणि तुम्ही कोड एडीट करून त्याला रन करून पाहू शकता, त्यासाठी अकाउंट उघडण्याची गरज नसते.
तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा स्मार्टफोन वर पायथॉन चे सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्या शिवाय केवळ ब्राउजर मध्ये ऑनलाइन कम्पाइलर वापरून पायथॉन प्रोग्रामिंग शिकू शकता.
farach sundar
उत्तर द्याहटवा