Learn Python in Marathi - Part 2

पायथॉन मध्ये कसे लिहावे आणि वाचावे



इथे आपण पायथॉन मध्ये बेरीज कशी केली जाते ते पाहू. खाली दिलेला प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा






आता आपण युजर कडून इनपुट घेवून त्याची बेरीज करू. यासाठी खाली Edit बटनावर क्लिक करा. त्याने हा कम्पाइलर फुल स्क्रीन मध्ये उघडेल. त्यात Run बटनावर क्लिक करा. त्यानंतर त्याच्या बाजूला किंवा खाली दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या पॅनल मधे एक नंबर लिहून एन्टर दाबा, त्यानंतर परत एक नंबर लिहून एन्टर दाबा. अशा रीतीने दोन नंबर लिहून झाल्यानंतर एन्टर दाबल्यावर लगेचच तिसऱ्या लाईन मध्ये तुम्हाला बेरीज दिसेल.





आता वरील प्रोग्राम मध्ये बदल करून त्यात तीन नंबर युजरला  एन्टर करण्यास सांगा आणि त्या नंतर त्यांची बेरीज दाखवा. वरील प्रोग्राम च्या विंडो मध्ये तुम्ही कोड एडीट पण करू शकता. सुरवातीला तुम्हाला फोर्क करायचा आहे का असे विचारणारी विंडो दिसेल. जर तुम्हाला बदल केल्यानंतर प्रोग्रामला सेव्ह करून ठेवायचे असेल तर त्यासाठी तुमचा स्वतःचा अकाउंट असला पाहिजे. तो तुम्ही त्या वेबसाईट वर विनामुल्य बनवू शकता. पण ते आवश्यक नाही. तुम्ही Cancel वर क्लिक करून त्यानंतर कोडला एडीट करून ते रन करून पाहू शकता.


Hint - Solution
a = int (input())
b = int (input())
c = int (input())
print (a + b + c)


Common mathematical operators used in Python

print (2 + 3)   # Addition

print (2 * 3)   # Multiplication

print (2 ** 3) # This means 2 raised to 3, that is 2*2*2

print ( 3/2)     # Division operator

print (13//3)   # Integer division. Remainder is ignored

print (13 % 3) # Modulus operator. Only remainder is printed



User Data Input
पायथॉन मध्ये यूजर कडून इनपुट



जेव्हा आपण युजर कडून टाईप केलेल्या अक्षरांचा किंवा अंकांचा वापर प्रोग्राम मध्ये करतो तेव्हा आपण input() या फंक्शन चा वापर करतो.





वर दिसणाऱ्या विंडो मध्ये Edit लिंक वर क्लिक करून कम्पाइलर फुल स्क्रीन मध्ये उघडा. आता Run बटन दाबा त्यानंतर काळ्या पॅनल मधे आपले नाव टाईप करा आणि एन्टर दाबा. त्यानंतर तुम्हाला खालील ओळीमध्ये या प्रोग्राम मध्ये लिहिलेला मेसेज दिसू लागेल

यापुढील लेख

टिप्पण्या