Learn Python in Marathi - Example - Sharing Chocolates

आज आपण पायथॉन वापरून हिशेब करू.  यासाठी मी एक उदाहरण देतो. समजा की तुमची बर्थडे पार्टी आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांना घरी बोलावले आहे आणि सर्वाना चॉकलेट्स वाटणार आहात. तुमच्याकडे  चॉकलेट्स चा एक बॉक्स किंवा एक पाकीट आहे.  प्रत्येक मित्राला किती चोकॉलेट्स देता येतील हे तुम्हाला मोजायचे आहे.

तर आपण पायथॉन मध्ये एक प्रोग्राम लिहू. पहिल्यांदा आपण मित्रांची संख्या आणि चॉकलेट्स ची संख्या विचारू. त्यानंतर प्रत्येक मित्राला किती चॉकलेट्स देता येतील ते ठरवू आणि त्यानंतर किती चॉकलेट्स शिल्लक राहतील ते मोजू.


print ("How many friends are there ?")
friends = int (input ())
print("How many chocolates have you got ?")
chocolates = int (input ())

प्रत्येक मित्राला किती चॉकलेट्स देता येतील हे मोजण्यासाठी पायथॉन मध्ये आपण  इन्टिजर डिविजन  // चा  वापर करू

maxChocolates = chocolates // friends

आता आपण उरलेले चॉकलेट्स मोजण्यासाठी मोड्यूलस ऑपरेटरचा वापर करू

remainingChocolates = chocolates % friends

Now display the results

print ("You can share " , maxChocolates , " chocolates to each of your friends")
print("And there will be " , remainingChocolates , " chocolates left in your box")

( friends, chocolates, maxChocolates and remainingChocolates)  हे सारे वेरिएबल्स आहे. आपण त्यांना इन्टिजर वेरिएबल्स म्हणून वापरत आहोत.

आता या प्रश्नाचे उत्तर आपण प्रिंट स्टेटमेंट मध्ये लिहू. याला तीन प्रकारे लिहिता येवू शकते.

We are using a comma ( , ) to separate or + to concatenate different strings and % to concatenate strings and integers. We can write the same print statements in three different ways.

print ("You can share", maxChocolates, "chocolates to each of your friends")

print ("You can share " + str(maxChocolates) + " chocolates to each of your friends")

print ("You can share %d chocolates to each of your friends" %maxChocolates)

वेगवेगळ्या ठिकाणी यापैकी एखादे प्रिंट स्टेटमेंट वापरणे सोयीचे ठरते. खालील उदाहरण रन करण्यासाठी पहिल्यांदा Edit on repl.it लिंक वर क्लिक करून ते फुल स्क्रीन मध्ये उघडा आणि त्यानंतर रन वर क्लिक करा. त्यानंतर काळ्या रंगाच्या विंडो मध्ये संख्या एन्टर करा.


यापुढील लेख


टिप्पण्या