युजर ने लिहिलेल्या डेट मधील संख्याची बेरीज करीत जाऊ; 1 पासून 9 पर्यंतचा एक अंक मिळेपर्यंत. न्युमरॉलॉजी मध्ये या अंकावरून तुमचा लाईफ पाथ ( जीवनाची दिशा) सांगितला जातो.
खाली लिहिलेला प्रोग्राम वाचून त्याला रन करून पहा. हा प्रोग्राम तुमच्या कम्प्यूटरवर पायथॉन शेल मध्ये रन करायचा असेल तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता. पहिल्या पॅनलच्या डावीकडे खालच्या बाजूला एक बाण दिसतो, त्यावर क्लिक करून हा प्रोग्राम तुम्ही डाउनलोड करू शकता.
प्रोग्राम रन करून पाहण्यासाठी डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी खाली रन बटनावर क्लिक करा.
या प्रोग्रामच्या सुरवातीला आपण Add_numbers(dob) या नावाचे एक फंक्शन डिफाइन केले आहे. या फंक्शन मधे यूजर कडून लिहिल्या गेलेल्या डेट ऑफ बर्थ चे सर्व आकडे जोडत जातो, त्यांना एक अंक मिळेपर्यंत जोडत जातो. शेवटी आपल्या जवळ 1 ते 9 पर्यंत चा एक आकडा शिल्लक राहतो.
या फंक्शन मध्ये लागणाऱ्या dob ची व्हॅल्यू आपण लाईन नंबर 20 मध्ये यूजर कडून एन्टर केल्यावर कलेक्ट करतो. final_answer या व्हॅरिएबल मध्ये आपण या फंक्शन चे आउटपुट स्टोर करतो.
त्यानंतर आपण if - elif - else चे स्टेटमेंट्स लिहितो. यामध्ये आपण final_output च्या 1 ते 9 पर्यंत च्या आकड्यासाठी वेगवेगळे मेसेज प्रिंट करून दाखवतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें