HTML ची तोंडओळख

आता आपण वेबसाईट बनविल्या जाणाऱ्या भाषेची माहिती घेऊ. त्याला HTML असे म्हणतात.  यासाठी आपण Notepad ++ या एडिटरचा वापर करू. हे एडिटर तुम्ही खालील लिंकवरून विनामूल्य डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता.

https://notepad-plus-plus.org/

खाली या एडिटर चा वापर करून लिहिलेला कोड दिसत आहे.हे वेब पेज ब्राउजर मध्ये उघडल्यानंतर असे दिसेल.


वरील चित्रामध्ये तुम्हाला एखाद्या वेबसाईटचे HTML कोड कसे असते आणि ते ब्राउजरमध्ये कसे दिसते याचा अंदाज आला असेल. आता आपण HTML या भाषेचे व्याकरण शिकू. म्हणजे सिनटॅक्स शिकू.
तुम्ही एखादे वेबपेज तयार करण्यासाठी विंडोच्या कॉम्प्युटरवर असलेले नोटपॅड हे टेक्स्ट एडिटर देखील वापरू शकता.HTML डॉक्यूमेंट कसा सेव्ह करावा


जेव्हा तुम्ही तुमच्या एडिटर मध्ये HTML चे कोड लिहाल त्यावेळी तुम्ही त्याला सेव्ह करताना .html हे एक्सटेन्शन वापरावे लागते.

उदाहरणार्थ index.html , home.html , page1.html

ज्यावेळी ही फाइल सेव्ह होईल तेव्हा त्या फाईल चा आईकॉन ब्राउजरप्रमाणे दिसू लागेल. तुम्ही ही फाईल जेव्हा डबल क्लिक कराल तेव्हा ब्राउजर मध्ये ते पान उघडेल. ब्राउजर मध्ये जर मराठी अक्षरे दिसत नसतील तर तुम्हाला दोन्ही पैकी एक गोष्ट करावी लागेल.

ब्राउजर मध्ये Encoding साठी Unicode (UTF8) हा पर्याय निवडा. उदाहरणार्थ गुगल क्रोम मध्ये, उजव्या कोपऱ्या तील आईकॉन वर क्लिक करून More Tools > Encoding > Unicode (UTF8) निवडा.

किंवा HTML डॉक्यूमेंट च्या सुरवातीला head च्या खाली meta टॅग मध्ये खालील ओळ लिहा.
Next Article

HTML चे बेसिक्स 

टिप्पण्या