HTML चे बेसिक्स

HTML मधील हेडिंग्स

आता आपण HTML मधील हेडिंगचे प्रकार पाहू . हेडिंग बनवताना h1 पासून h6 पर्यंतचे टॅग वापरले जातात.   h1 टॅग सर्वात मोठा हेडर किंवा हेडिंग बनवतो आणि त्या पुढील टॅगमध्ये हा आकार क्रमाक्रमाने लहान होत जातो. एखाद्या लेखामध्ये वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळी हेडिंग देण्यासाठी याचा वापर होतो.

हेडर साठी वापरले जाणारे टॅग



ब्राउजर मध्ये दिसणारे हेडर



आपल्याला हवे असेल तर हेडिंग मधील अक्षरांचा फॉन्ट, बैकग्राउंड कलर, अक्षरांचा कलर बदलता येतो. ते आपण नंतर पाहू.


HTML पॅराग्राफ्स 


HTML मध्ये पॅराग्राफ्सची मर्यादा ठरवण्यासाठी p आणि  /p या टॅग्सचा वापर केला जातो. एक  पॅराग्राफ पूर्ण झाल्यानंतर दूसरा पॅराग्राफ सुरु करण्यासाठी परत p आणि /p हे टॅग्स वापरले जातात.

पॅराग्राफ्स साठी वापरले जाणारे टॅग



ब्राउजर मध्ये दिसणारे पॅराग्राफ्स 



HTML मधील लिंक्स


HTML मध्ये एखाद्या वेबसाईट वर जाण्यासाठी जी लिंक दिली जाते ती खालील प्रमाणे लिहिली जाते.


ही लिंक ब्राउजर मध्ये अशी दिसेल


या ठिकाणी आपण "ही एक लिंक आहे " या अक्षरांवर क्लिक केल्यास http://www.comprolive.com ही वेब साईट उघडेल.

HTML मध्ये चित्रे


HTML मध्ये आपल्याला जी चित्रे, फोटो दिसतात ते खालील प्रमाणे लिहिले जातात. पहिल्यांदा तुम्हाला ते चित्र तुमच्या वेबपेजच्या फोल्डर मध्ये सेव्ह करावे लागेल. त्यानंतर ते दिसण्यासाठी खालील प्रमाणे कोड लिहावा.


वेब साईट वर हा कोड असा दिसेल 










 


टिप्पण्या