मुलांसाठी प्रोग्रामिंग - बी सिक़्वेन्सया आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या  Course1 मध्ये Stage7 Bee Sequence चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू. 


येथे आपल्याला एक मधमाशी दिसते. या मधमाशीच्या हालचाली आपण अॅरोचे ब्लॉक्स वापरून ठरवू शकतो. या मधमाशीच्या वाटेमध्ये आपल्याला फुले दिसतात. एखाद्या फुलापर्यंत पोचल्यानंतर त्यातील परागकण वेचण्यासाठी get हा ब्लॉक वापरावा लागतो. तसेच पोळ्यापर्यंत पोचल्यावर make हा ब्लॉक वापरावा लागतो.

एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक फुले असतील तर तेथे अंक लिहिलेला दिसतो. व अशा वेळी तुम्हाला get हा कमांड एकापेक्षा अधिक वेळा वापरावा लागेल. तसेच चित्रात एकापेक्षा अधिक पोळे असतील तर त्याचा अंक लिहिलेला दिसेल व तुम्हाला या वेळी तितक्या वेळा make हा कमांड वापरावा लागेल.

या स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.
     

यापुढील लेख - 

टिप्पण्या