स्मार्टफोनवर एकाच रंगाचा स्प्लॅश इफेक्ट


या पोस्ट मध्ये आपण  पिक्स्लर एक्सप्रेस फोटो एडिटर मध्ये फोटोवर स्प्लॅश इफेक्ट  कसा बनवावा हे पाहू. स्प्लॅश इफेक्ट  म्हणजे फोटोच्या रंगांमधून फक्त एकच रंग दिसावा आणि बाकिचा हिस्सा ब्लैक एंड व्हाइट बनावावा. 

मी काढलेल्या फळांच्या एका फोटोवर हा स्प्लॅश इफेक्ट आजमावून पाहू. जर तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वर पिक्स्लर एक्स्प्रेस इंस्टाल केला नसेल तर त्याची माहिती तुम्हाला या पोस्ट वर मिळेल.

फोटो एडिटर मध्ये फोटो उघडल्यानंतर, पहिल्यांदा "adjustment"मेनू निवडा आणि नंतर "splash" हा मेनू निवडा .




मग तुमचा फोटो हा स्प्लॅश इफेक्ट साठी एडीट मोड मध्ये येतो. आता तुम्ही स्क्रीन वर फोटोच्या  ज्या भागाला स्पर्श कराल तेथील रंग निवडला जातो, आणि तोच रंग शिल्लक ठेवून बाकीचे रंग काढले जातात. मी वेगवेगळे रंग निवडून त्यांचे इफेक्ट खालील फोटो मध्ये दाखवले आहेत.




टिप्पण्या