पिक्स्लर एक्सप्रेस मध्ये कॅमेऱ्याचा वापर

येथे आपण पिक्स्लर एक्सप्रेस मध्ये आपल्या कॅमेऱ्याचा वापर कसा करावा हे पाहू. मागील लेखामध्ये आपण या अॅपची ओळख करून घेतली. आपण मागील लेख वाचला नसेल तर या पानाच्या शेवटी तुम्हाला त्याचे लिंक दिसून येईल.

 पिक्स्लर एक्सप्रेस हे स्मार्ट फोन साठी फोटो एडिटिंग चे फ्री अॅप आहे.

पिक्स्लर एक्सप्रेस जेव्हा उघडाल तेव्हा तुम्हाला "camera" या नावाचा पहिला मेनू दिसेल. त्यावर टच केल्यास तुमच्या स्मार्ट फोन चा कॅमेरा सुरु होतो. बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला त्याची कल्पना येईल. स्क्रीन च्या खालील बाजूस दिसणाऱ्या पांढऱ्या बटनावर टच केल्यास फोटो काढला जातो.

फोटो काढल्यानंतर तुम्हाला दोन मेनू दिसू लागतात. "Retake" - म्हणजे जर फोटो मनासारखा आला नसेल तर हा फोटो हटवून , नवीन फोटो काढण्यासाठी या मेनू चा वापर करता येतो. जर फोटो तुमच्या मनासारखा आला असेल तर "Use Photo" हा पर्याय निवडावा.


असे केल्यास तुम्ही काढलेला फोटो एडीट मोड मध्ये उघडेल . एडीट करण्यासाठी असलेल्या ओप्शंस ची माहिती आपण पुढील पोस्ट मध्ये घेऊ.

मागील लेख : पिक्स्लर एक्सप्रेसची तोंडओळख 

टिप्पण्या