पिक्स्लर एक्सप्रेस फोटो एडिटिंग अॅप

आज आपण तुमच्या स्मार्ट फोन साठी एका विनामुल्य फोटो एडिटिंग अॅप बद्दल माहिती घेऊ. इंटरनेट वर स्मार्ट फोन साठी फोटो एडिटिंग करणाऱ्या खूप अॅप आहेत पण त्यापैकी पिक्स्लर एक्सप्रेस हे अॅप ऑटो डेस्क या कंपनीच्या मालकीचे आहे ( ऑटो डेस्क ही कंपनी ऑटोकॅड सोफ्टवेअर बनवते )

याच्या मध्ये कॉम्प्युटर वर वापरल्या जाणाऱ्या फोटो एडिटिंग सोफ्टवेअर इतक्याच क्षमता आहेत.


तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वर नेहमी ज्या पद्धतीने नवीन अॅपस इंस्टाल करता तसेच, पहिल्यांदा  (Pixlr express) हे नाव शोधा. तुम्हाला लगेचच त्याचे डाउनलोड लिंक सापडेल व त्याला इंस्टाल करू शकता. हे अॅप विनामुल्य आहे, त्यामुळे खर्चाचा प्रश्नच येत नाही.

मी या व यापुढील लेखामध्ये या अॅप च्या वापराबद्दल सविस्तर माहिती देईन. हे अॅप आईफोन, आईपॅड, अँड्रोइड व इतर सर्व प्रकारच्या स्मार्ट फोन वर चालते. लगतच्या चित्रा मध्ये माझ्या आईपॉड मध्ये पिक्स्लर एक्सप्रेस उघडलेला दिसत आहे. यामध्ये पहिल्या स्क्रीन वर तीन मेनू दिसतात. त्यातील पहिला मेनू (camera) तुमच्या स्मार्ट फोन चा कॅमेरा उघडतो, व फोटो काढल्यानंतर तुम्ही त्याला सरळ एडीट करू शकता. जर तुमच्या स्मार्ट फोन मध्ये सेव्ह करून ठेवलेले फोटो तुम्हाला एडीट करावायचे असतील तर (fotos) या दुसऱ्या  मेनू चा  वापर करावा. तर तिसरा मेनू हा फोटोचा कोलाज करण्यासाठी वापरता येतो.
स्क्रीन च्या वरील बाजूस डाव्या कोपऱ्यामध्ये एक चाकासारखे चिन्ह दिसून येते त्यावर टच केल्यास एक नवीन पान उघडते.
यामध्ये खालील बाजूस तुम्ही हे सोफ्टवेअर वापरत असताना त्याबद्दलची माहिती कंपनी कडून गोळा केली जाते, त्याबद्दलचे हे पान आहे. तुम्ही खालील बटन डावीकडे सरकावून ही परवानगी नाकारू शकता.

बर्याचदा या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून पहिल्यांदाच याबद्दल तुम्हाला हे सांगितले.

या नंतरच्या पोस्ट मध्ये मी  पिक्स्लर एक्सप्रेस च्या फोटो एडिटिंग मेनू बद्दल माहिती देईन. वाचावयास विसरू नका . जर तुमच्या स्मार्ट फोन मध्ये इंटरनेट च्या वापरावर निर्बंध नसेल तर तुम्ही याबद्दलचा व्हिडीओ खाली पाहू शकता.
पुढील लेख : पिक्स्लर एक्सप्रेस मध्ये कॅमेऱ्याचा वापर

टिप्पण्या