एस जयशंकर याची रशिया भेट

 


सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री श्री सुब्रमण्यम जयशंकर रशिया यात्रेसाठी गेले आहेत.  रशिया आणि युक्रेन मधील भांडण सुरु असताना भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही भेट महत्वाची आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्र्यांसोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश, शेती, आणि परिवहन खात्याचे प्रतिनिधी मंडळ ही सोबत गेले आहे. 

दोन्ही देशानमध्ये सध्या १७ अब्ज डॉलर्सचा वार्षिक व्यापार होतो, तो ३० अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचे लक्ष दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी स्वीकार केले. 

भारताच्या बाजूने  परराष्ट्र मंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या भारत सरकारने सुरु केलेल्या योजनांची माहिती रशियाला दिली. म्हणजे जर काही रशियन कंपन्या भारतात येऊन नवीन कारखाने उभारणार असतील तर त्यांचे स्वागत करण्यात येईल. इतर पाश्च्यात्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधाने त्रस्त होत असलेल्या रशियाला स्वतःची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी एस जयशंकर यांच्या या भेटीचा नक्कीच लाभ होईल.




टिप्पण्या