HC-05 Bluetooth module with Arduino (in Marathi)

आज आपण HC-05 Bluetooth Transmitter/ Receiver  मॉड्यूलला  Arduino Uno. ला जोडून  स्मार्ट फोन वरून आरडूइनो ला जोडलेली उपकरणे ऑन-ऑफ कशी करता येतात ते पाहू.

The HC-05


मी हा ब्लूटूथ मॉड्यूल अमाझोन वेबसाईट वरून विकत घेतला. तुम्लाला हवे असल्यास  या लिंक वर  तुम्ही अमॅझॉन  वर उपलब्ध असलेले ब्लूटूथ मोड्यूल्स पाहू शकता.


हा आरडूइनो सोबत वापरला जाणारा लोकप्रिय मॉड्यूल आहे. याचे एक नवीन व्हर्जन HC-06 पण मिळते. पण हे नवीन व्हर्जन फक्त डाटा रिसीव करण्यासाठी वापरता येते, तर HC-05 हा ट्रांसमीटर आणि रिसीवर अशी दोन्ही कामे करू शकतो.



वर दिसणाऱ्या पिनांमधून आपल्याला फक्त चार पिना वापरायच्या आहेत. VCC ला आरडूइनो च्या  3.3 v ला जोडा.  GND ला आरडूइनो च्या GND शी जोडा. RXD ही रिसीवर पिन आहे आणि TXD ही ट्रान्समीटर पिन आहे.




 HC-05 च्या RXD ला आरडूइनोच्या TX ला आणि  TXD ला RX शी जोडा.

☹️ येथे हमखास नकळत होणारी चूक -  RXD ला  RX शी आणि  TXD ला TX शी जोडण्याची.

जेव्हा आपण आरडूइनो मध्ये प्रोग्राम अपलोड करतो तेव्हा  RX, TX या पिनांचा वापर होतो. या पिना एकाच वेळी दोन सर्किट मध्ये काम करू शकत नाहीत,  त्यामुळे प्रोग्राम अपलोड करताना, TX, RX ला जोडलेल्या वायरी काढून टाका. प्रोग्राम अपलोड पूर्ण झाल्यानंतर परत जोडा.

Testing HC-05 module with Arduino

आपण  HC-05 मॉड्यूलला आरडूइनो शी असे जोडू

VCC - 3.3 v
GND - GND
TXD - RX
RXD - TX

आता ब्रेड बोर्ड वर एका एलईडी ला 330 Ohms चा रेजिस्टर जोडा.  रेजिस्टर चे एक टोक एलईडी च्या छोट्या  पिन ला  (-ve ) एनोडला  आणि दुसरे टोक  ब्रेड बोर्ड च्या कॉमन रेल ला जोडा. इतर कॉम्पोनन्ट पासून येणाऱ्या ग्राउंड च्या वायरी याच रेल ला जोडा.
आणि एलईडी चा   (+ve) कैथोड आरडूइनो च्या  पिन 7 शी जोडा. 

या प्रयोगासाठी आपण हा प्रोग्राम वापरू

void setup() {
 Serial.begin(9600);
 pinMode(7, OUTPUT);
 digitalWrite(7, LOW);
  }


void loop() {
   if(Serial.available()>0)
   {     
      char x = Serial.read();
      switch(x)
      {
        case 'a': digitalWrite(7, HIGH);break; 
        case 'b': digitalWrite(7, LOW);break;
        default : break;
      }
        delay(50);
   } //end switch
} //end loop 


// येथे आपण pin 7 ला आउटपुट पिन असे डिक्लेर केले आहे,  तेव्हा आपण एलईडीला या  पिन शी जोडू.
//Serial.begin()  हा फंक्शन आरडूइनो आणि ब्लूटूथ मोड्यूल मध्ये सिरिअल कम्युनिकेशन सुरु करतो , TX आणि RX या पिना मार्फत

//SerialWrite(7,LOW) या मुळे एलईडी सुरवातीला ऑफ करून ठेवली जाते.
//Serial.available() या फंक्शन चा वापर करून आपण ब्लूटूथ मॉड्यूल कडून सिरिअल पोर्ट कडे काही डाटा पाठवला जात आहे की नाही हे चेक करू शकतो.
// त्या नंतर आपल्याला एक कॅॅरेेक्टर व्हेरिएबल  डिक्लेअर करावे लागते. येथे  मी x चा वापर केला आहे. सिरिअल पोर्ट कडे येणारा डाटा या व्हेरिएबल मध्ये स्टोर करून त्याला प्रोग्राम मध्ये वापरता येते.

//येथे आपण switch- case चा वापर करत आहोत. तुमच्या स्मार्ट फोनवर  ब्लूटूथ टर्मिनल ऍप वर जेव्हा तुम्ही एखादे कॅॅरेेक्टर टाइप कराल तेव्हा ते x या कॅॅरेेक्टर  व्हेरिएबल मध्ये स्टोर केले जाते. जर तुम्ही 'a' टाइप कराल तर एलईडी ऑन होईल आणि जर 'b' टाइप कराल तर एलईडी ऑफ होइल.

या प्रयोगासाठी आपण ब्लूटूथ टर्मिनल या  ऍप चा वापर करू.
हा  ऍप वापरून आपण आरडूइनोच्या सर्व डिजिटल इन/आउट पोर्टला  (2 पासून  13 पर्यंत) कण्ट्रोल करू शकतो..

पुढील प्रयोगात आपण आरडूइनोचे इतर काही पोर्ट कनेक्ट करून त्यांना स्मार्टफोन ने ऑन/ऑफ करून पाहू.

या प्रयोगासाठी वापरलेल्या  प्रोग्राम चा कोड आपण   या लिंक वरून  डाउनलोड करू शकता.

या प्रयोगासाठी मी जो ऍप वापरला आहे त्याचे नाव  आहे Arduino Bluetooth Terminal by Fredrik Hauke. हा आपण  येथून इंस्टॉल  करू शकता

सर्किट मध्ये वोल्टेज डिवाइडर जोडा   

आपल्याला आरडूइनोच्या TX पिन आणि HC-05 मॉड्यूलच्या RXD पिन मध्ये वोल्टेज डिवाइडर.जोडावे लागेल. कारण आरडूइनो 5v वर चालतो, आणि आपण HC-05 ला 3.3v.वर चालवतो. आरडूइनोच्या TX पिन मधून जाणारा 5v चा सिग्नल HC-05 मॉड्यूलला नुकसान करू शकतो त्यामुळे या वोल्टेजला कमी करण्यासाठी आपण दोन रजिस्टर्स वापरू. 1K आणि 2K चा प्रत्येकी एक. आपण हे रजिस्टर्स ब्रेडबोर्ड ला जोडू.. 2 K च्या रजिस्टर चे एक टोक ब्रेडबोर्ड च्या कॉमन रेलला जोडा. त्याच रो (ओळी) मध्ये 1 K चा रजिस्टर पण जोडा. . दोन्ही रजिस्टर्स मध्ये काही जागा ठेवा, जिथे आपण HC-05 मॉड्यूल च्या RXD पिन पासून येणारी वायर जोडू . 1 K च्या रजिस्टर चे दुसरे टोक ब्रेडबोर्ड च्या दुसऱ्या भागात जाईल, रजिस्टरच्या या टोकापासून आपण एक वायर आरडूइनोच्या TX पिन ला जोडू. तर अशा रीतीने आपले वोल्टेज डिवाइडर तयार झाले

बाकी सर्किट पूर्वी प्रमाणेच जोडा.
आरडूइनोच्या ग्राउंड पिन ला ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलला जोडा.
HC-05 च्या ग्राउंड पिन ला ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलला जोडा.
HC-05 च्या VCC ला आरडूइनो च्या 3.3 v पिन शी जोडा .
HC-05 च्या TXD पिन ला आरडूइनो च्या RX पिन शी जोडा
एलईडीच्या +ve ला आरडूइनो च्या 7 नंबर वाल्या पिन शी जोडा

आता आपला सर्किट वोल्टेज डिवाइडर सोबत पूर्ण झाला. .



सर्किट जोडून झाल्यावर आरडूइनो वर प्रोग्राम अपलोड करून पूर्वीप्रमाणेच तुम्ही याला टेस्ट करू शकता.

4 एलईडीज ला ब्लूटूथने कसे कंट्रोल करावे ?


आपण एका एलईडीला ब्लूटूथने कंट्रोल करून पहिले, आता आपण चार एलईडीजला कंट्रोल करू.
यासाठी आपण चार एलईडीज आणि 270 Ohms चे चार रजिस्टर्स वापरू. हे सारे कॉमपोनंट्स ब्रेडबोर्डवर असे जोडावे लागतील.
चारी एलईडीजच्या  निगेटिव्ह  आणि ब्रेडबोर्डच्या कॉमन रेल मध्ये एक एक रजिस्टर जोडा.
आता HC-05 ब्लूटूथ मॉड्यूलच्या VCC आणि आर्डूईनोच्या 3.3v च्या पिन मध्ये एक वायर जोडा.
आता आर्डूईनोच्या GND पिन आणि ब्रेडबोर्डच्या कॉमन रेल मध्ये एक वायर जोडा.
आता ब्रेडबोर्डच्या कॉमन रेल आणि ब्लूटूथ मॉड्यूल च्या GND मध्ये एक वायर जोडा
आता ब्लूटूथ मॉड्यूलच्या TXD आणि आर्डूईनो च्या RX पिन  मध्ये एक वायर जोडा
आता ब्लूटूथ मॉड्यूलच्या RX आणि व्होल्टेज डिवाइडरच्या दोनन रजिस्टरर्स  मध्ये एक वायर जोडा जसे यापूर्वी सांगितले आहे
आता 1K च्या रजिस्टर आणि आर्डूईनोच्या TX पिन मध्ये एक वायर जोडा
यानंतर आपण प्रत्येक एलईडीच्या पॉजिटिव्हला आणि आर्डूईनोच्या डिजिटल पोर्टला एक एक वायर  जोडू. येथे मी पिन 7, 8. 9, आणि 10 शी जोडलो आहे.
आता यानंतर ब्रेडबोर्डच्या दोन भागातील कॉमन रेलला एक वायर जोडा. कारण हे सर्किट ब्रेडबोर्डच्या दोन  भागात पसरलेले आहे
वायरिंग पूर्ण झाल्यानंतर  प्रोग्रामला डाऊनलोड करून  त्याला कंप्यूटर वर ओपन कराआणि त्याला आर्डूईनो वर अपलोड करा. प्रोग्राम का कोड इथून डाउनलोड करा 
यापूर्वी आपण जो ऍप  इंस्टाल केला होता तो ओपन करा.
येथे कैपिटल A, B, C आणि D टाइप करून  त्याला सेंड केल्यास एक एक एलईडी ऑन होइल. आणि स्माल a, b, c, आणि d
टाइप केल्यास एलईडी ऑफ होतील . आप एका पेक्षा जास्त  characters पण सेंड करून  पाहू शकता.

टिप्पण्या