Programming a Tact switch in Arduino with xod in Marathi

Hello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू

या प्रोजेक्ट साठी जे components आपण वापरू ते आहेत
1) Arduino चा board
2) एक Breadboard
3) काही wires
4) एक Tact Switch
5) एक LED
6) Resistors - 220 Ohm, आणि 10 Kilo Ohm

आपण वायरिंग ने सुरुआत करू.
या प्रोजेक्टचे सर्किट डायग्राम मी Tinker cad मध्ये बनवले आहे.
ही एक फुल साईज इमेज आहे. तुम्ही ही या लिंक वरून डाऊनलोड करू शकता



आधी आपण Tact switch ला ब्रेड बोर्ड वर ठेऊ.
याला फक्त एका तऱ्हेनेच बसवता येते .
याला ब्रेड बोर्डच्या मधोमध असलेल्या स्लॉट वर बसवावे लागते.
आता मी याच्या एका पायाला 10 kolo ohms चे resistor जोडतो.

Resistor चे दुसरे टोक ब्रेड बोर्डच्या निगेटिव्हला जोडू
आता आपण ब्रेड बोर्ड वर LED ला जोडू

आता LED च्या छोट्या पायाला/ Cathode ला 220 ohms चे resistor जोडा.
Resistor चे दुसरे टोक ब्रेड बोर्डच्या निगेटिव लाईनला जोडा

आता मी Arduino च्या ग्राउंड पिनला एक काळी वायर जोडतो आणि 5 वोल्टच्या पिनला लाल वायर जोडतो
काळ्या वायरीचे दूसरे टोक आता ब्रेड बोर्डच्या निगेटिव मध्ये जाईल आणि लाल वायरीचे दूसरे टोक ब्रेड बोर्डच्या पोजिटिव मध्ये जाईल
आता आपण स्विचच्या एका पायाला लाल वायरने सप्लायशी जोडू
आता स्विचच्या रजिस्टर वाल्या पिनला मी पिवळी वायर जोडतो आणि त्याचे दुसरे टोक Arduino च्या 10 नंबरच्या पोर्टला जोडतो
आता LED च्या लांब पायाला म्हणजे (Anode ला ) मी एक पांढरी वायर जोडतो आणि त्याचे दुसरे टोक Arduino च्या 11 नंबरच्या पोर्टला जोडतो
आता आपण या सर्किटला पॉवर देऊ.
मी यामध्ये प्रोग्राम यापूर्वीच अपलोड करून ठेवलेला आहे.
आता LED जळताना दिसते.
जेव्हा आपण Switch ला प्रेस करू तेव्हा ती ऑफ होईल आणि बटन दबलेले असे पर्यंत ती ऑफ राहील

आता आपण या सर्किट मध्ये काही बदल करून पाहू.  तुम्ही ही सर्किट  या लिंक वरून डाऊनलोड करू शकता



स्विचला जोडलेल्या रजिस्टरला मायनसच्या ऐवजी प्लसला जोडू
आणि स्विचच्या दुसऱ्या पायाला एक काळी वापरून मायनसला जोडू.

असे केल्यावर पॉवर ऑन झाल्या वर LED जळणार नाही.

आणि जेव्हा आप स्विच प्रेस करू तेव्हाच जळेल.

आणि LED तेव्हा पर्यंत ऑन राहील जेव्हा पर्यंत आपण स्विचला दाबून ठेऊ
तर असे हे दोन सर्किट आहेत ज्यांना xod च्या एकाच प्रोग्रामने कण्ट्रोल करता येते.

आता आपण हा प्रोग्राम कसा बनवला ते पाहू
आधी Arduino ला कॉम्प्युटरशी कनेक्ट करा.
त्या नंतर xod ला उघडा. 

त्यात i प्रेस करा, आणि त्यात "led" टाइप करा आणि LED ब्लॉकला सेलेक्ट करा
त्याला स्क्रीन वर ड्रैग करून इतरत्र ठेवा, कारण त्या नंतरचा ब्लॉक त्याच जागेवर दिसू लागतो

आता i प्रेस करून त्यात "button " टाइप करा आणि रिझल्ट मध्ये सेलेक्ट करा

आता तुम्हाला button नाव चे ब्लॉक दिसेल
आता बटन ब्लॉकला led वाल्या ब्लॉकच्या वर सेट करा
आता बटन ब्लॉकला सेलेक्ट करून त्यात पोर्ट नंबर 10 टाइप करा
आता LED ब्लॉकला सेलेक्ट करून त्यात पोर्ट नंबर 11 टाइप करा
आता बटनवाल्या ब्लॉकच्या PRS शी LED वाल्या ब्लॉकच्या LUM पर्यंत एक रेघ ओढा

तर हा झाला आपला प्रोग्राम. एवढाच आहे.
आता याला Arduino मध्ये अपलोड करा .

अपलोड करताना सिरिअल पोर्ट मध्ये जे नाव दिसते त्यात (Arduino LLC) दिसणे आवश्यक आहे, त्याशिवाय अपलोड पूर्ण होणार नाही

अपलोड पूर्ण झाल्यावर तुम्ही या दोन सर्किट्सला टेस्ट करून पाहू शकता

टिप्पण्या