Learn Alice3 Programming in Marathi

मी Alice 3 च्या  प्रोग्रामिंग ट्युटोरिअल ची यूट्यूब वर सीरिज बनवत आहे.   Aice3  हे एक फ्री सॉफ्टवेअर आहे. यामध्ये 3D मॉडल्स रेडीमेड असतात. मॉड नावाचे एक ह्यूमन कॅरेक्टर बनवणारे सॉफ्टवेअर यामध्ये समाविष्ट केले गेले आहे. याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे मानवी कार्टून कॅरेक्टर बनवू शकता. आणि या 3D मॉडल्स ला Alice3 मध्ये प्रोग्राम करून त्यांची मूवमेंट करता येते. अणि याचे व्हिडिओ बनवून यूट्यूब वर ताकता येतात.

मी व्हिडिओ मधे दाखवलेल्या ट्युटोरिअल च्या फाईली डाउनलोड साठी उपलब्ध केलेल्या आहेत.  यामध्ये आतापर्यंतच्या  ट्युटोरिअल च्या सर्व फाईली आहेत. ही एक सिंगल कंप्रेस्ड जिप फाईल आहे. याला डाऊनलोड करून अनजिप (अनकॉम्प्रेस) करा. त्यामध्ये तुम्हाला a3p आणि  bak एक्सटेंशन च्या फाईली दिसतील.

Alice3 Tutorials Download

जर तुम्ही अजून  Alice3  इंस्टाल केला नसेल तर या  लिंक वरून डाऊनलोड करू शकता

http://www.alice.org/get-alice/alice-3/

Alice3 इनस्टॉल झाल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटर वर

Documents - Alice 3 - MyProjects

या नावाची फोल्डर दिसेल

अनकॉम्प्रेस करताना  TutorialFilesHindi या नावाची फोल्डर तयार झाली तर त्यातल्या फाईली MyProjects मध्ये कॉप्य करा.  TutorialFilesHindi ही फोल्डर कॉपी न करता फक्त त्यातल्या फाईली कॉपी करा. तेव्हा हे सर्व  ट्युटोरिअल्स तुम्हाला  Alice3 च्या ओपनिंग स्क्रीन मध्ये दिसतील आणि तुम्ही त्यांना ओपन करून रन करू शकता.  नाहीतर ओपन फाईल डायलॉग बॉक्स मध्ये पहिल्यांदा तो फोल्डर ओपन करून  मग त्या फाईली ओपन कराव्या लागतील.

यानंतर जसे जसे नवीन ट्युटोरिअल्स बनतील, तसे तसे त्यांच्या फाईली डाउनलोड साठी उपलब्ध केल्या जातील


टिप्पण्या