Learn Python in Marathi - Print and Format

आज आपण पायथॉन मध्ये प्रिंट आणि फॉर्मेट फंक्शन्सची माहिती घेऊ. आपण प्रिंट फंक्शनचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो

print("amazon","Echo")
amazon Echo

print("amazon","echo", sep="")
amazonecho
print("amazon","echo", sep=".")
amazon.echo

print("amazon","echo", sep="-")
amazon-echo 

sep हे प्रिंट फंक्शन मध्ये एक पॅरामीटर आहे. sep म्हणजे separator.  प्रिंट फंक्शन मध्ये आपण जे काही लिहू, तेथील दोन शब्दांमध्ये स्पेस असावे किंवा नाही, किंवा आणखी काही असावे हे आपण  sep चा वापर करून ठरवू शकतो.

जर आपण प्रिंट फंक्शनचा वापर केला तर दोन शब्दांमध्ये आपोआप एक स्पेस मिळतो. आपण  sep वापरून हा स्पेस हटवू शकतो, किंवा स्पेस ऐवजी डॉट/बिन्दू किंवा डैश/हायफन/ समास चिन्ह जोडू शकतो

प्रिंट फंक्शन मध्ये शब्द किंवा अक्षरे लिहिण्यासाठी कोट्स/उद्धरण चिन्हाचा वापर केला जातो. आपण सिंगल किंवा डबल क्वोट्सचा वापर येथे करू शकतो

प्रिंट फंक्शन लिहिताना print चा p लहान लिहावा लागतो. मोठा P लिहिल्यास  प्रोग्राम चालणार नाही


Escape Sequence

जर तुम्हाला प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये  Apostrophe चे चिन्ह ' दाखवायचे असेल तर एस्केप कॅरेक्टरचा वापर करावा लागतो. यासाठी बैकवर्ड स्लैश \ वापरला जातो. म्हणजे  \' असे लिहिल्यास एपॉस्ट्रॉफ़ी प्रिंट होते. एस्केप सिक्वेंस शिवाय एपॉस्ट्रॉफ़ी लिहिल्यास प्रोग्राम रन केल्यास एरर मेसेज दाखवेल

पण डबल क्वोट " दाखवण्यामध्ये काही अडचण येत नाही. आपण याला एस्केप सिक्वेंस शिवाय देखील लिहू शकता.

print('It\'s obvious')
It's obvious

print('Add a "Quote" within quote')
Add a "Quote" within quote


Format function

आता आपण फॉर्मेट फंक्शनची माहिती घेऊ.  याला प्रोग्रामचा आउटपुट फॉर्मेट करण्यासाठी वापरले जाते

print("You can buy {} for {} Rupees per Kg" .format('Onions', 30))
You can buy Onions for 30 Rupees per Kg


प्रिंट मध्ये जे काही शब्द किंवा अक्षर (स्ट्रिंग ) लिहू ते कोट्स मध्ये लिहावे लागते, त्यामध्ये आपण {} असे कोष्टक टाकून ठेऊ शकतो, याला प्लेस होल्डर म्हणतात. म्हणजे जागा पकडणे. आणि नंतर त्या जागी आपण हवी ती माहिती जोडू शकतो.

format ला क्वोट्सच्या बाहेर लिहिले जाते  .format च्या सुरवातीला एक डॉट दिला जातो, नंतर एका कोष्टकात  ( ) प्लेसहोल्डर  भरणारी माहिती लिहिली जाते. याला वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते


Positional Index in the placeholders

आपण  प्रिंटच्या प्लेस होल्डर्स {} मध्ये क्रमांक लिहू शकतो.

print('This Train will start from {0} and stop at {1}' .format('Varanasi','Pune'))
This Train will start from Varanasi and stop at Pune

print('This Train will start from {1} and stop at {0}' .format('Varanasi','Pune'))
This Train will start from Pune and stop at Varanasi

Date and Time format

डेट आणि टाईम (तारिख आणि वेळ) लिहिण्यासाठी जे फॉर्मेटिंग केले जाते ते खाली दाखवले आहे. यासाठी datetime हे मॉड्यूल इम्पोर्ट करावे लागते

from datetime import datetime
print('The Train will start on {:%Y-%m-%d %H:%M}'.format(datetime(2018, 1, 17, 10, 20)))
The Train will start on 2018-01-17 10:20

टिप्पण्या