Learn Python in Marathi - Tuples

आज आपण पायथॉन मध्ये टुपल कशाला म्हणतात ते पाहू.  मागील आर्टिकल मध्ये आपण लिस्ट बद्दल माहिती घेतली. जर तुम्हाला पायथॉन मधील लिस्ट समजली असेल तर टुपलला समजणे फारच सोपे आहे.

पायथॉन मध्ये लिस्ट आणि टुपल हे दोन्ही ही डाटा टाईप आहेत. जेव्हा आपण एक लिस्ट बनवतो तेव्हा  [ ] या स्केअर ब्रॅकेट्स चा वापर करतो. तर एक टुपल बनवताना ( ) अशा ब्रॅकेट्सचा वापर केला जातो. एक टुपल ही एक लिस्टच आहे. पण लिस्ट बनवून झाल्यानंतर आपण त्यात दुसरे एलिमेंट्स जोडू किंवा काढू शकतो, तसे आपण टुपल मध्ये करू शकत नाही. याला आपण असे समजू की टुपल एक फायनल लिस्ट आहे ज्यात काही बदल केला जावू शकत नाही.


यासाठी आपण एक लिस्ट बनवू आणि त्याच एलिमेंट्स / तीच नावे वापरून  [ ] ऐवजी  ( ) लिहून त्याला टुपल बनवून दोन्हीमध्ये काय बदल दिसतो ते पाहू. पायथॉनच्या शेल मध्ये कोणत्याही लिस्ट चे नाव लिहून त्यासमोर एक डॉट . देवून थोडा वेळ थांबा, तुम्हाला एक पॉप अप दिसेल ज्यात काही फंक्शन्स की लिस्ट दिसेल. तर ही यादी कोणत्याही लिस्ट सोबत वापरले जावू शकणाऱ्या फंक्शन्सची आहे.आता हीच नावे वापरून आपण एक टुपल बनवू अणि त्या नावासमोर एक डॉट देऊन थोडा वेळ थांबल्यास फंक्शन्स ची लिस्ट दिसेलयावरून आपल्याला लिस्ट आणि टुपल मधील फरक लक्षात येईल.  पायथॉन मध्ये  टुपल ही एक लिस्ट आहे ज्यात बदल करता येत नाही. म्हणजे एकदा टुपल तयार झाल्यावर त्यात बदल करता येत नाही

टिप्पण्या