Learn Python in Marathi - Part 3 - Strings

आज आपण पायथॉन मधील लिस्ट, स्ट्रिंग आणि टूपल बद्दल माहिती घेऊ. हे अनुक्रमिक (sequential) डाटा टाइप आहेत. यामध्ये आपण  (character string) म्हणजे अक्षर आणि शब्द, अंक (numbers) आणि अन्य डाटा टाइप (स्टोर करू शकता) साठवू शकता.

पायथॉन मधील स्ट्रिंग मधील (म्हणजे एखादे शब्द किंवा वाक्य ) प्रत्येक अक्षर त्याच्या ठिकाणा वरून हाताळता येते.  म्हणजे (0, 1, 2...)  याला इंडेक्स म्हणतात . ही शून्या पासून मोजायला सुरवात केली जाते. उदाहरणार्थ

Saying = "A Friend in need in a Friend indeed"
print(Saying[0], Saying[3], Saying[4],Saying[7])
A r i d

याच तऱ्हेने  शब्द, अंक किंवा इतर गोष्टींचे लिस्ट मधील ठिकाण मोजले जाते.

Lists


पायथॉन च्या लिस्ट मध्ये आपण शब्द, अंक किंवा फोर्मुले देखील लिहू शकता. येथे काही उदाहरणे पाहू

stateCapitals = ["Mumbai", "Delhi", "Calcutta", "Hyderabad","Bengluru"]
print("Capital of Maharashtra is "+ stateCapitals[0])
Capital of Maharashtra is Mumbai

myNumbers=[15,54,87,99,67]
print("The Fourth number in the list is" , myNumbers[3])
99
       
पायथॉन ची रिकामी  (empty) लिस्ट बनवली जावू शकते, आणि नंतर युजर कडून त्यात हवी ती माहिती जोडली जावू शकते. लिस्ट मध्ये तुम्ही इतर लिस्ट  (नेस्टेड लिस्ट) ची यादी बनवू शकता. लिस्ट मधून तुम्ही कोणतीही वस्तू जोडू शकता, किंवा हटवू शकता. दोन लिस्ट एकत्र जोडून एक नवी लिस्ट बनवली जावू शकते.  

stateCapitals.append("Ahmedabad") 
print("The capital of Gujarat used to be", stateCapitals[5])
 The capital of Gujarat used to be Ahmedabad

stateCapitals.insert(5,"Gandhinagar")
print("However, the present capital of Gujarat is ", stateCapitals[5])
 However, the present capital of Gujarat is  Gandhinagar

mylist = ["Maharashtra",["Mumbai","Pune","Nagpur"]]
print("These are some of the important cities in ", mylist[0]," - ", mylist[1][0], mylist[1][1], mylist[1][2])
  These are some of the important cities in  Maharashtra  -  Mumbai Pune Nagpur


एखाद्या लिस्ट मध्ये एखादे अक्षर, शब्द किंवा अंक किती वेळा आलेले आहे हे देखील आपण लिस्ट न पाहता देखील मोजू शकतो.

mylist = ["potato", "banana", "orange", "banana", "pomegranate","banana"]
print(  "The term banana has appeared ", count.mylist("banana"), " Times in this list")
  The term banana has appeared  3  Times in this list

लिस्ट मधील वस्तूंपैकी फक्त काही वस्तू तुम्हाला प्रिंट करायच्या असतील तर इंडेक्स नंबर चा वापर करून प्रिंट करता येते. याला स्लाइस म्हणतात.

myList = [9, 7, 34, 67, 81, 40, 25]
print(myList[1:5])
[7, 34, 67, 81]

 जसे  [1:5] या स्लाइस मुळे 1 क्रमांकावर असलेल्या अंकापासून ते 5  क्रमाकापर्यंत चे सर्व अंक (5 वा सोडून) प्रिंट केले जातात. लिस्ट मधील वस्तू  (0) शून्या पासून मोजली जातात.

या प्रकारे पायथॉन च्या लिस्ट मध्ये तुम्ही बऱ्याचश्या गोष्टी करू शकता.

यापुढील लेख


टिप्पण्या