Automatic water level controller


Walnut Innovations चे नवीन वाटर लेवल कंट्रोलर


जर तुमच्या घरात नळाचे पाणी टाकी मध्ये साठवून मोटारीने वरील टाकीत सोडत असाल तर ही मशीन तुमचे काम सोपे करू शकेल

मोटारीने पाणी भरताना ज्या समस्या येतात त्यामध्ये ओवर फ्लो ही एक प्रमुख समस्या आहे.  मोटार सुरु केल्यानंतर वरील टाकी मध्ये पाणी कुठल्या लेवलला गेले आहे हे लक्षात न आल्यामुळे बऱ्याचदा पाणी भरून वाहू लागल्यावर आपल्या लक्षात येते.

दुसरी अडचण म्हणजे वरील टाकीतले पाणी संपले हे आपल्याला संपल्यावरच लक्षात येते.

एक ऑटोमेटिक वाटर लेवल कंट्रोलर या बाबीपासून आपली सुटका करू शकतो


Walnut Innovations ही कंपनी इंडस्ट्रियल व होम ऑटोमेशन आणि सिक्युरिटी चे प्रॉडक्ट्स बनवते. त्यांचे वाटर लेवल कंट्रोलर walnutinnovations.com या साईट वर आणि amazon.in सारख्या साईट्स वरून विकत घेता येवू शकतात.

या कंपनीने एक नवीन वाटर लेवल कंट्रोलर बनवले आहे जे आपण येथे पाहू. हा कंट्रोलर लवकरच लॉंच होणार आहे.

हा मेक इन इंडियाच्या प्रेरणेने बनवलेला इंडियन प्रॉडक्ट आहे.  या प्रॉडक्ट चे तीन वर्जन
यांनी बनवले आहेत

Standard, VSP आणि 3Phase. 

Standard - हे  मॉडेल सिंगल फेज मोनोब्लोक आणि ओपन वेल टाइप पम्प सेट साठी उपयुक्त आहे. घरामध्ये अशा प्रकारचे मोटर / पम्प वापरले जातात

VSP - हे मॉडेल सिंगल फेज व्हरटीकल सबमर्सिबल पम्प सेट (स्टार्टर सह) साठी उपयुक्त आहे

Three Phase - हे मॉडेल 3 फेजच्या पम्प सेट साठी उपयुक्त आहे.

मी स्टँण्डर्ड मॉडेल इंस्टाल केलेले आहे. या कंट्रोलर सोबत 6 वाटर लेवल सेंसर मिळतात. खालच्या टाकी साठी तीन आणि वरच्या टाकी साठी तीन.

 या कंट्रोलर मध्ये कनेक्शन साठी जे पॉइंट्स आहेत, त्यांच्यावर लिहिलेली नावे वरील टाकी साठी  (O) overhead tank आणि खालील टाकी साठी (U) underground tank 



इथे तुम्हाला  OH, OL, C , C, UH, UL ही नावे दिसून येतात 

Upper Tank

OH -  (Overhead High) वरील टाकी मध्ये सगळ्यात वर लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे
OL - (Overhead Low) वरील टाकी मध्ये मध्यभागी लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे
C - (Common)  वरील टाकी मध्ये सगळ्यात खाली तळाला लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे

Bottom Tank



UH -  (Underground High) खालील टाकी मध्ये सगळ्यात वर लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे
UL - (Underground Low) खालील टाकी मध्ये मध्यभागी लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे
C - (Common)  खालील टाकी मध्ये सगळ्यात खाली तळाला लावलेल्या सेन्सर ला हे नाव दिलेले आहे


हे सेन्सर्स टाकीत सोडण्यापूर्वी तुम्हाला टाकीची खोली मोजावी लागेल.  

वरील टाकीत पाण्याची पातळी जेव्हा OL सेन्सरच्या खाली जाईल तेव्हा मोटर चालू होईल. आणि पाण्याची पातळी OH सेन्सर ला स्पर्श करे पर्यंत मोटार चालू राहील, त्यानंतर मोटर बंद होईल

म्हणजे प्रत्येक वेळी मोटर सुरु झाल्यानंतर  OL पासून OH पर्यंत पाणी वरच्या टाकीत चढवले जाते. तुमच्या गरजेनुसार तुम्ही या सेन्सर्स मधील अंतर हवे तेव्हा कमी किंवा अधिक करू शकता

C या सेंसर ला कॉमन सेंसर म्हणतात, आणि हा सेन्सर टाकीच्या तळापर्यंत पोचला पाहिजे 

मोटर सुरु होण्यापूर्वी खालील टाकीत पुरेसे पाणी आहे कि नाही हे तपासले जाते. यासाठी UH या सेन्सर चा वापर होतो. त्यामुळे खालील टाकीमध्ये सर्वात वरील सेन्सर तुम्हाला नळाचे पाणी येऊन गेल्यानंतर जी पातळी नेहमी मिळते त्याच्या खाली असावी, म्हणजे मोटर आपोआप सुरु होऊ शकेल. साधारणपणे खालील टाकीच्या अर्ध्या खोलीवर हा सेन्सर बसवावा.

UL हा सेन्सर मोटरच्या फूट वाल्व्हच्या 2 इंच वर बसवावा, या सेन्सर च्या खाली पाणी पोचल्यास मोटर बंद होते, आणि ड्राय रन म्हणजे पाणी नसताना मोटर चालू असणे टाळता येते.    

खालील टाकीत पण C या सेंसर ला कॉमन सेंसर म्हणतात, आणि हा सेन्सर टाकीच्या तळापर्यंत पोचला पाहिजे 

एकदा सेन्सरची कामे लक्षात आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सेन्सरला किती लांबीची वायर लागेल ते ठरवता येईल

सेन्सर ला जोडण्यासाठी  2.5mmचे सिंगल कोर वायर वापरता येते.  तुम्हाला प्रत्येक टाकीमध्ये प्रत्येकी तीन वायरी वेगवेगळ्या लांबीचे कापावे लागतील. सेन्सर टाकीत सोडल्यावर वायरी टाकीच्या बाहेर असाव्या, आणि त्यांना तेथे एखाद्या पाईप किंवा इतर कशाचा आधार देऊन बांधावे म्हणजे सेन्सर आपल्या जागेपासून सरकणार नाहीत.

water level sensor


हरेक सेंसर के उपरी हिस्से में एक वायर के लिए छेद और स्क्रू होते हैं, जहाँ पर आप वायर के सिरे की फिक्स कर सकते हैं

प्रत्येक सेन्सरला वरील बाजूला एक होल आणि दोन स्क्रू असतात, तेथे तुम्ही वायरीचे टोक जोडू शकता

वरील टाकीत सेन्सर्स बसवताना पाईप मधून टाकीत पडणारे पाणी सेन्सर वर पडणार नाही अशा ठिकाणी सेन्सर बसवावे, नसता सेन्सर वर सतत पाणी पडत राहिल्यास चुकीचे सिग्नल कंट्रोलरला जावू शकते

टाकीत सेन्सर्स बसवताना जोडलेल्या वायरीच्या दुसऱ्या टोकावर OH,OL,C आणि  UH,UL,C असे लिहून टेप चिटकवावा म्हणजे पुढे केबल ला वायरी जोडताना कुठली वायर कोणत्या सेन्सर ला जोडलेली आहे हे समजण्यास अडचण होणार नाही

सेन्सर्स के वायरों से लेकर कंट्रोलर तक हमें 0.75mm 3 कोर केबल की जरूरत पड़ेगी.
3 कोर केबल में लाल, हरा और काले रंग के वायर होते हैं. इन्हें हम इस प्रकार से कनेक्ट कर सकते हैं

 सेन्सरच्या वायरीपासून कंट्रोलर पर्यंत आपल्याला 0.75mm 3 कोर केबल वापरता येईल  

लाल वायर - OH आणि  UH
हरी वायर  - OL आणि  UL
काळी वायर  - C 

3 कोर ची केबल वरील आणि खालील टाकीपासून कंट्रोलर पर्यंत आणा 

कंट्रोलरच्या मागील पॅनल वर चार होल आहेत. त्याचे मार्किंग करून भिंतीवर चार होल पाडून, 1.5 इंच स्क्रू वापरून कंट्रोलर भिंतीवर बसवावा

कंट्रोलर बसवल्यास दोन्ही टाक्यापासून येणारे 3 कोर केबल जोडून घ्यावे.  कनेक्शनसाठी कंट्रोलर वर  OH, OL, C , C, UH, UL असे पॉइंट्स दिलेले आहेत

हे दोन्ही केबल जोडल्यानंतर इनपुट आणि आउटपुट चे वायर जोडावे. त्यापूर्वी mcb किंवा मेन स्वीच बंद करावा.

वायरिंग पूर्ण झाल्यानंतर स्वीच ऑन केल्यानंतर वरील टाकीत पाण्याची पातळी कमी असेल आणि खालील टाकीत पुरेसे पाणी असेल तर मोटर चालू होईल. 

वरील टाकीत पाण्याची पातळी OH पर्यंत पोचल्यावर मोटर बंद होईल.

जर तुम्हाला खालील टाकीत सेन्सर न बसवता फक्त वरच्या टाकीतच सेन्सर बसवायचे असतील तर दोन वायरी चे तुकडे UH पासून UL आणि UL पासून  C ला जोडावे.

मोटर चालू असताना काही कारणाने तुम्हाला ती बंद करायची असेल किंवा मोटर बंद असताना तुम्हाला ती चालू करायची असेल तर कंट्रोलर वर असलेले काळे बटन दाबावे.

तर अशा रीतीने वापरण्यास सोपा पण बहुपयोगी असा हा ऑटोमेटिक वाटर लेवल कंट्रोलर आहे.




टिप्पण्या