Walnut Innovations Day night switches in Marathi


आज आपण डे नाईट स्विचेस बद्दल माहिती घेऊ. यांना लाईट सेंसिटिव स्विच देखील म्हंटले जाते.  या प्रकारच्या स्विचेसचा वापर संध्याकाळी आपोआप लाईट लावण्यासाठी आणि सकाळी आपोआप लाईट बंद करण्यासाठी होतो. सडकेवर लावलेल्या जाहिरातींच्या बोर्डवर असलेले दिवे, किंवा अशा कुठल्याही ठिकाणचे दिवे जेथे लाईटचे बटन दाबणारा हजर नसेल.


या प्रकारच्या स्विचेचा वापर आपण घरात देखील करू शकतो. जर तुम्ही  बंगल्यावजा घरात रहात असाल तर घरच्या अंगणातील, गार्डन मधील, गेट वरील, आणि परसातील दिवे संध्याकाळी आपोआप पेटवण्यासाठी आणि सकाळी बंद करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या स्विचेस चा वापर करू शकता.

मी आपल्याला वालनट इनोवेशन्स या कंपनी कडून बनवलेल्या आणि विकले जात असलेल्या स्विचेसची माहिती देईन. उदयपुर मध्ये असलेली ही एक भारतीय कंपनी आहे जी इंडस्ट्रीयल आणि होम ऑटोमेशन व सिक्युरिटीशी संबंधीत उपकरणे बनवते आणि विकते असे कंपनीच्या वेबसाईट वर दिलेल्या माहिती वरून समजते.

यांचे प्रॉडक्ट तुम्ही   Walnutinnovations.com  या वेबसाईट वरील त्यांच्या ऑनलाइन स्टोर मधून किंवा अमॅझॉन सारख्या शॉपिंग साईट वरून विकत घेऊ शकता

या स्विचेसला अशा ठिकाणी ठेवावे लागते जेथे त्यांच्यावर दिवसा उजेड पडेल.  पांढऱ्या रंगाचे स्विच अशा ठिकाणी बसवावे जेथे त्यावर पावसाचे पाणी पडणार नाही. पण काळ्या रंगाचे स्विच वाटर प्रूफ आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

हे चांगल्या क्वालिटी चे स्विचेस आहेत. यात समोरच्या बाजूला लाईट सेंसर लावलेला असतो, जो प्रकाशाची प्रखरता मोजतो. 20 लक्स पेक्षा  कमी प्रकाश झाल्यास स्विचला तो चालू करतो आणि 35 लक्स पेक्षा अधिक प्रकाश झाल्यास तो स्वीचला बंद करतो.

या  स्विचला तुम्ही 500 वॅट पर्यंत लोड जोडू शकता. घराच्या अंगणात, गेट वर, किंवा बागे मध्ये असणारे एलईडीचे बल्ब साधारणपणे 3 पासून 9 वॅट चे एक एक असतात. तुम्ही एकाच बटनाला जोडलेले अनेक बल्ब या स्विचने नियंत्रित करू शकता.

 वालनट कंपनी या स्विचेसची एक वर्षाची वारंटी देते. विकत घेतल्यापासून पहिल्या सहा महीन्या पर्यंत रिप्लेसमेंटची अणि पुढील सहा महीने रिपेअरची. गरज पडल्यास तुम्ही कंपनीला फोन करून तुम्हाला हवी ती तांत्रिक माहिती घेऊ शकता.

या स्विचेसला कसे टेस्ट करावे, त्यांना ठेवण्यासाठी योग्य जागा कशी निवडावी, त्यांची वायरिंग कशी करावी आणि त्यांना कसे इंस्टाल करावे हे मी खालील व्हिडिओ मध्ये समजावले आहे.


टिप्पण्या