About Infrared IR Receivers in Marathi

Click to enlarge
आज आपण  amazon india वर सध्या मिळणाऱ्या इन्फ्रा रेड रिसीवर्स बदल माहिती घेऊ, तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट साठी हे सेन्सर्स घेताना या माहितीचा उपयोग होईल. ( वरील चित्रात तुम्हाला  TSOP1738 या क्रमांकाचा इन्फ्रारेड सेन्सर आणि त्याचे पिन डायग्राम दिसत आहे.)


या वेळी amazon in वर इन्फ्रा रेड रिसीवर शोधल्यास दोन प्रकारचे रिसीवर दिसून येतात. एक आहे  TSOP1738 आणि दुसरा आहे VS1838B

दोन्हीही सेन्सर्स सारखेच काम करतात, त्यामुळे तुम्ही दोन्ही पैकी जो तुम्हाला मिळेल त्याचा वापर करू शकता,

काही वेळा विक्रेता / सेलर एका मॉडल नंबर ऐवजी दुसऱ्या मॉडल नंबरचे रिसीवर गिऱ्हाईकाला पाठवून देतात. मलाही असाच अनुभव आला.  मी अॅमॅझॉन  च्या साईट पर तीन नग TSOP1738 चे ऑर्डर केले, पण मला मिळाले तीन नग  VS1838B चे.

सेंसर माझ्या हातात आल्या नंतर त्याचा मॉडल नंबर पाहून मी इन्टरनेट वर त्याचा पिन डायग्राम शोधला आणि त्याचा वापर केला.

हे आर्टिकल लिहिताना मी माझ्या ऑर्डरच्या हिस्ट्री मध्ये पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की मी  TSOP1738 चे ऑर्डर केले होते.

या सेन्सर्स चा वापर करताना मला काही अडचण आली नाही पण अॅमॅझॉन इंडियावर काही ग्राहकांचे कमेन्ट वाचून मला हे कळाले की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या मॉडेल चे सेन्सर्स पाठवले गेले होते. कदाचित ज्या विक्रेत्याकडे जो स्टॉक असेल त्यानुसार ते नग पाठवत असतील.

ग्राहकांचे कॉमेंट वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात आली की त्यापैकी बर्याच जणांनी सेन्सर काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

या सेन्सर च्या विक्रीच्या पानावर TSOP1738 या सेन्सरचे चित्र आणि त्याचे पिन डायग्राम देखील दिले गेले होते.

तेव्हा माझ्या लक्षात आले की, जर एखाद्या व्यक्तीला VS1838B चा नग पाठवला गेला असेल आणि त्याने विक्रेत्याच्या पानावरील पिन डायग्राम पाहून जर हा दुसरा सेन्सर वापरायचा प्रयत्न केला असेल तर नक्कीच तो सेन्सर काम करणार नाही.

कारण   TSOP1738 और VS1838B या दोन्ही सेंसर चे पिन कनेक्शन वेगवेगळे आहेत.

Click to Enlarge

तर ही आहेत स्टँड अलोन रिसीवर्स, या व्यतिरिक्त काही बोर्ड पण विक्रीला आहेत ज्यांच्यावर हे सेन्सर्स फिट केलेले असून त्यासोबत एक रेजिस्टर आणि एक एलईडी  पण जोडलेली आहे.

यामुळे या रिसीवर बोर्ड चा वापर करताना एलईडीच्या चमकण्याने तुम्हाला एक विजुअल इंडिकेशन मिळते.

हा खाली दिसणारा बोर्ड पहा. यामध्ये VS1838B बसवलेला आहे, पण याचे पिन कनेक्शन TSOP1738 सारखे आहेत.

हा एक डुअल लेयर पीसीबी आहे, ज्यावर  VS1838B चा सेंसर बसवलेला आहे, पण याचे कनेक्शन फिरवून जोडले गेले आहेत, याची कारणे त्याच्या निर्मात्यांनाच माहीत.

पण तुम्हाला  या बोर्डचे पिन जाणून बुजून वेगळे बनवलेले आहेत हे माहित असल्यास वायरिंग करताना तुमच्या हातून चुका होणार नाहीत किंवा विनाकारण कन्फ्यूजन होणार नाही

या बोर्डवर तुमच्या सोयीसाठी पिनच्या सिग्नल (S) आणि  मायनस ( - ) च्या पिनांना मार्क केलेले आहे.  तर अशा रीतीने TSOP1738 चा सेन्सर आणि त्याचा बोर्ड याच्या पिनामध्ये फरक आहे.

Click to enlarge

जर तुमच्याकडे असा बोर्ड असेल तर त्याची मधली पिन पॉजिटिव सप्लाय ( +5 V )ला जोडावी. - च्या पिनला ग्राउंड ला जोडावे आणि  S लिहिलेल्या पिनला तुम्हाला आउटपुटचे सिग्नल मिळेल. तो जाईल मायक्रो कंट्रोलरच्या/ अर्दुइनोच्या कोणत्याही एक डिजिटल पिनला.  

तर तुम्ही कोणताही इन्फ्रा रेड रिसीवर सेंसर घेता असेल, तर त्यावर लिहिलेला मॉडल नंबर जरूर पहा आणि इन्टरनेट वर त्याचा पिन डायग्राम शोधा.  एका मॉडल च्या सेंसर चे पिन दुसऱ्या मॉडल सारखेच असतील असे नाही. ही सावधगिरी बाळगल्यास विनाकारण मनस्ताप होण्यापासून तुम्ही वाचू शकता.  

टिप्पण्या