![]() |
click to enlarge |
यापूर्वी तुम्ही Blink हा प्रयोग केला असेल, जो आर्डूइनो मध्ये पहिलाच प्रयोग आहे. तर हा प्रयोग देखील त्याच प्रकारचा आहे.
ब्लिंक या प्रयोगामध्ये आपण एक एलइडी आर्डूइनोशी जोडतो. एलइडीचे लांब पिन 13 क्रमांकाच्या पिनशी जोडतो, एलइडीच्या छोट्या पिनला आपण एक रेजिस्टर जोडतो, आणि रेजिस्टरचे दुसरे टोक ग्राउंड ला जोडतो. या प्रयोगामधे देखील असेच करायचे आहे.
ब्लिंक प्रयोगामधे जो प्रोग्राम आपण वापरला होता त्यामधे एलइडीची उघडझाप करण्यासाठी आपण delay() हा फंक्शन वापरतो. पण यामध्ये अडचण ही येते की आर्डूइनो उनोचा बोर्ड वापरून जर तुम्ही इतर कॉम्पोनंट संचालित करीत असाल तर delay() फंक्शन मुळे त्या सर्वांचे काम तेवढ्या वेळासाठी थांबते. त्यामुळे असे न होता तुम्हाला जर एलइडी ची उघडझाप हवी असेल तर त्यासाठी millis() हे बिल्ट इन फंक्शन वापरता येते.
हा फंक्शन आर्डूइनो उनोच्या बोर्डला वीज पुरवठा सुरु झाल्यापासून वेळ मोजायला सुरवात करतो आणि पन्नास दिवसापर्यंत ही वेळ मोजू शकतो. ही वेळ मिली सेकंदात मोजली जाते, त्यामुळे या टायमर चा वापर करून आपण किती वेळ झाला हे मोजू शकतो. हे Digital - BlinkWithoutDelay या प्रोग्राम मध्ये वापरले आहे. या प्रोग्राम चे संक्षिप्त स्वरूप मी येथे देत आहे. त्यावरून हा प्रोग्राम कसा लिहिला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल.
![]() |
click to enlarge |
या प्रयोगासाठी लागणारे साहित्य तुम्हाला कोणत्याही आर्डूइनो उनो स्टार्टर किट मध्ये मिळेल. या किटच्या जाहिराती तुम्हाला या पानावर उजव्या बाजूला दिसतील. त्याच बरोबर या प्रयोगासंबंधी अधिक माहिती तुम्हाला माझ्या खालील युट्यूब व्हिडिओ मध्ये दिसेल.
कोई टिप्पणी नहीं:
टिप्पणी पोस्ट करें