Arduino Basics - solderless electronic Breadboards

click to enlarge


आज आपण ब्रेडबोर्ड बद्दल माहिती घेऊ. वरील चित्रामध्ये दिसणारे सर्व ब्रेडबोर्ड अमॅझॉन वर मिळतात. उजवीकडील मोठे दोन ब्रेडबोर्ड हे फुल साईझचे आहेत. दोन्हीमध्ये फरक म्हणजे डावीकडच्या ब्रेडबोर्ड वर निळ्या आणि लाल रंगाच्या रेषा पॉवर लाईनसाठी ओढलेल्या दिसून येतात आणि दुसऱ्यावर त्या नाहीत. पण उजवीकडचा ब्रेडबोर्ड आकाराने थोडासा मोठा दिसतो. माझ्या अनुभवावरून उजवीकडचा ब्रेडबोर्ड घेणे चांगले.ब्रेडबोर्ड च्या पिना कशा प्रकारे बसवलेल्या असतात हे समजावून घेण्यासाठी नारळाची एक फांदी डोळ्यासमोर आणावी. नारळाची पाने जशी उगवलेली असतात तसेच ब्रेडबोर्डच्या मध्यभागी एका सरळ रेषेत जागा सोडलेली असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला याच्या क्लिपा बसवलेल्या असतात.  


खालील चित्रात एक ब्रेडबोर्ड समोरून आणि मागून दाखवलेला आहे. ब्रेडबोर्ड च्या दोन्ही बाजूला पॉवर कनेक्शन साठी क्लिपा असतात. या ठिकाणी आठ क्लिपा आहेत. प्रत्येक बाजूला चार. प्रथम दर्शनी या वरपासून खालपर्यंत जात असलेल्या दिसतात. पण प्रत्यक्षात मध्यभागात या वेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही या ब्रेडबोर्ड वर आवश्यकता असल्यास चार ठिकाणी वेगवेगळा सप्लाय जोडू शकता. काहे ब्रेडबोर्ड वर वरपासून खालपर्यंत सलग पिना असू शकतात. लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा या पॉवर सप्लायच्या सीमेपर्यंत खेचलेल्या असतात. वर दाखवलेल्या ब्रेडबोर्ड वर तुम्हाला या रेषा मध्यभागात वेगळ्या झालेल्या दिसून येतील.   
click to enlarge
खालील चित्रात एक मिनी ब्रेडबोर्ड दिसतो. याला पॉवर साठी वेगळे लेन दिलेले नाहीत. याच्या मागील बाजूला एक स्टीकर चिटकावलेले असते, त्यावरील कागद वेगळा केल्यास हा ब्रेड बोर्ड तुम्ही कशावरही चिटकावू शकता. प्रत्येक ब्रेडबोर्ड च्या मागे अशा प्रकारचे स्टीकर दिलेले असते.  वरील चित्रात ब्रेडबोर्डची मागील बाजूचे क्लिप्स आपल्याला दिसतात. मी या ब्रेडबोर्ड च्या मागील स्टीकर काढून टाकून त्याला सिंथेटिक ग्लू वापरून पारदर्शक अॅक्रीलिकच्या शीटची चौकोनी पट्टी कापून त्यावर चिटकावले आहे.    


टिप्पण्या