Servo motor Arduino Uno in Marathi


या प्रयोगामध्ये आपण एक सर्व्हो मोटर वापरू. रोबोट्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. वरील चित्रात दिसत असलेली मोटर ही Tower Pro SG 90. आहे. ही छोटीशी मायक्रो सर्व्हो मोटर दोनशे रुपयापर्यंत मिळते. 
खालील चित्रात याचे कनेक्टर पिन दिसत आहे.याच्या पिनला तीन वायरी असतात. नारंगी, लाल आणि तपकिरी ( ऑरेंज, रेड आणि ब्राऊन ) तीन वायरी आहेत. यामध्ये रेड आणि ब्राऊन ला पॉवर सप्लाय 5 V चा द्यावा. रेडला पॉजिटिव 5 V अणि ब्राऊनला ग्राउंड. आणि ऑरेंज वायर सिग्नल ची आहे.

 ही वायर तुम्ही आरडूइनोच्या डिजिटल पिनापैकी PWM लिहिलेल्या कोणत्याही एका पिनला जोडू शकता.

त्यानंतर मोटारीच्या शाफ्ट ला जोडण्यासाठी तीन वेगवेगळ्या आकाराचे आर्म्स यासोबत मिळतात, त्या[ पैकी एक आर्म जोडलेला वरील चित्रात दिसतो.

सर्व्होच्या पिनला आरडूइनोच्या बोर्डशी जोडण्यासाठी तीन छोट्या वायारींचा उपयोग करा. यासाठी तुम्ही कुठल्याही रंगाच्या वायरी वापरू शकता.
यानंतर आपण आरडूइनो साठी वापरला जाणारा प्रोग्राम पाहू. हा प्रोग्राम तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. Servo.ino या नावाचा हा प्रोग्राम डाउनलोड करून आरडूइनोच्या एडिटर मध्ये उघडा.

https://goo.gl/KoJTxK

या प्रोग्राम मधील कोड खालील प्रमाणे आहे.

#include
या ओळीमध्ये आपण Servo.h या नावाची लायब्ररी किंवा हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये वापरू.

Servo myservo;
येथे आपण myservo या नांवाचे एक Servo ऑब्जेक्ट बनवले.

void setup()
{
  myservo.attach(9);
}

या ठिकाणी आपण या सर्व्होला नऊ नंबरच्या पोर्टशी जोडतो.

void loop()
{
  myservo.write(90);
  delay(1000);
  myservo.write(180);
  delay(1000);
  myservo.write(0);
  delay(1000);
 }


या ठिकाणी आपण या सर्व्होला 180 डिग्री ने फिरवतो. हा सर्व्हो  0 ते 180 डिग्री पर्यंत फिरवता येतो. आणि प्रत्येक वेळी आपण1000 मिली सेकंदाचा म्हणजे एक मिनिटाचा अवकाश घेतो.

तर समजण्यास सोपा असा हा प्रोग्राम आहे. या व्यतिरिक्त आपण सर्व्होच्या शाफ्टच्या फिरण्याचा वेग ही नियंत्रित करू शकतो.  

हा प्रोग्राम डाउनलोड करून त्याला आरडूइनोच्या IDE मध्ये उघडा. त्यातील मेनू खालील प्रमाणे दिसतील.

 या मधील पहिले आईकॉन हे Verify चे आहे. त्यावर क्लिक करा. Verification पूर्ण झाल्यावर खाली त्याचा एक मेसेज दिसेल. त्यानंतर दुसरे  आईकॉन हे अपलोड चे आहे त्यावर क्लिक करा. यावेळी तुमचा आरडूइनो चा बोर्ड कॉम्प्युटरशी जोडलेला असावा. तर हा प्रोग्राम बोर्डवर अपलोड होईल. त्यानंतर लगेचच तुम्हाला सर्व्हो चा शाफ्ट फिरत असलेला दिसू लागेल. 

टिप्पण्या