या प्रयोगासाठी आपण जो प्रोग्राम लिहिणार आहोत तो तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.
https://goo.gl/o4vu4V
हा प्रोग्राम डाउनलोड करून तो Arduino च्या IDE मध्ये उघडा. हा प्रोग्राम कशा रितीने लिहिला गेला आहे ते आपण समजावून घेऊ.
void setup()
{
Serial.begin(9600);
}
setup हा Arduino च्या प्रोग्राम मध्ये वापरला जाणारा पहिला फंक्शन आहे. यामध्ये आपण प्रयोगासाठी आवश्यक बाबी सेट करतो.
Serial.Begin हा Arduino चा बिल्ट इन फंक्शन आहे. या फंक्शन ने सीरिअल पोर्टशी Arduino ला जोडले जाते आणि त्याच्या कम्युनिकेशन साठी 9600 चा बॉड रेट फिक्स केला जातो.
void loop()
{
loop हा Arduino चा दुसरा फंक्शन आहे.
float V, C, F;
या ठिकाणी आपण V, C आणि F या नावाचे तीन floating variables डीक्लेअर करतो.
V = getVoltage(0);
getVoltage हे आपण लिहिलेले फंक्शन आहे. यामध्ये लिहिलेले (0) हा आपण वापरत असलेल्या Analog पोर्ट चा क्रमांक आहे. या फंक्शनच्या नावाप्रमाणे A0 या analog पोर्टला टेम्पेरेचर सेन्सर च्या सिग्नल पिन पासून मिळणारे व्होल्टेज मोजले जाते.
C = (V - 0.5) * 100.0;
हा फ़ॉर्मूला मिळालेल्या व्होल्टेज पासून डिग्री सेंटीग्रेड मध्ये तापमान मोजण्यासाठी वापरला जातो. हा या सेन्सर च्या डाटा शीट मध्ये दिलेला आहे.
F = C * (9.0/5.0) + 32.0;
तापमानाला डिग्री सेंटीग्रेड पासून फॅरेनहाइट मधे बदलण्यासाठी वापरला जातो.
Serial.print("voltage: ");
Serial.print(V);
Serial.print(" deg C: ");
Serial.print(C);
Serial.print(" deg F: ");
Serial.println(F);
हे कमांड स्क्रीन वरील सीरिअल मॉनिटर वर V , C , आणि F या variables च्या values लिहिण्यासाठी वापरलेले आहेत.
delay(1000);
प्रत्येक वेळी values लिहिल्यावर 1000 मिली सेकंद म्हणजे एक मिनिट थांबण्यासाठी.
float getVoltage(int P)
{
return (analogRead(P) * 0.004882814);
}
getVoltage या फंक्शन मध्ये जे व्होल्टेज मोजले जाते ते AnalogRead() हे फंक्शन वापरून. AnalogRead() हे Arduino चे बिल्ट इन फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये आपल्याला ज्या पिन मधील व्होल्टेज मोजायचे आहे ते द्यावे लागते.
हा प्रोग्राम वर दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा. त्यानंतर त्याला Arduino च्या IDE मध्ये उघडा. त्यानंतर Verify व नंतर Upload चे बटण दाबा म्हणजे प्रोग्राम Arduino च्या बोर्ड वर अपलोड होईल. त्यानंतर स्क्रीन च्या वरील भागात उजव्या कोपऱ्यातील Serial Monitor वर क्लिक करा म्हणजे Com3 या नावाने एक नवीन विंडो उघडेल व त्यामध्ये तुम्हाला Voltage, Degree C, आणि Degree F समोर तुमच्या रूम मधील तापमान दिसू लागेल. हे तापमान दर मिनिटाला अपडेट होत असलेलेही दिसेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें