गेम बनवूया - मनीकॉप्टर


आज आपण स्क्रॅच मध्ये एक मजेदार गेम बनवूया. हा गेम तुम्ही वरील चित्रावर क्लिक करून खेळू शकता. या गेमची आईडिया अगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणा वरून घेतलेली आहे. मागील चित्रामध्ये भारतीय वायू सेनेने विकत घेतलेले अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर दिसत आहे.

गेमला सुरवात झाल्यानंतर तुम्हाला एक कार्टून हेलीकॉप्टर उजवी - डावीकडे फिरत असलेले दिसते. खाली एक मांजराचे कार्टून आहे. डावे आणि उजवे अॅरो कीज वापरून या मांजराला तुम्ही हलवू शकता. स्पेस बार दाबल्यावर मांजर एक दगड वर फेकते. दगड हेलीकॉप्टरला लागल्यावर त्यामधून एक डॉलरचे बंडल खाली पडते. हे बंडल मांजराच्या चित्रावर पडल्यावर ते तुमच्या खात्यात जमा होते. तीस सेकंदात तुम्ही जितकी बंडले गोळा कराल ते तुम्हाला गेमच्या शेवटी दिसते.
 हा गेम कसा बनवला आहे आणि यासाठी कुठले कोड वापरले आहे हे तुम्ही या प्रोजेक्टच्या होम पेज वर पाहू शकता.
https://scratch.mit.edu/projects/108287257/

टिप्पण्या