स्क्रॅच ट्युटोरिअल्स - अॅरो कीज वापरून कार्टून कसे हलवावे

आता आपण स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटर मध्ये एखाद्या कार्टून ला अॅरो कीज वापरून कसे हलवावे किंवा चालवावे ते पाहू.   पहिल्यांदा स्क्रॅच एडिटर उघडा. त्यामध्ये एक मांजराचे चित्र दिसते. आपण त्याचा वापर करू.
चार अॅरो कीज कार्टूनशी जोडण्यासाठी खालीलप्रमाणे कोड लिहावा.
यामध्ये आपण सर्वात वर Forever लूप चा वापर केला आहे.
त्यामध्ये  If - then चे चार ब्लॉक्स आहेत.
यामध्ये फिकट निळ्या रंगाचे सेन्सिंग ब्लॉक्स वापरले आहेत.
Key - pressed या ब्लॉक मध्ये तुम्हाला कोबोर्ड वरील कोणत्याही की ला सेलेक्ट करता येते. येथे आपण प्रत्येक key-pressed ब्लॉक मध्ये अनुक्रमे  right arrow, left arrow, up arrow आणि down arrow निवडलेले आहे.

गडद निळ्या रंगाचे ब्लॉक्स हे मोशन ब्लॉक्स आहेत. यामध्ये  point in direction या ब्लॉक मध्ये चार पर्याय आहेत. 90 डिग्री म्हणजे उजवीकडे, -90 डिग्री म्हणजे डावीकडे, 0 डिग्री म्हणजे वरील बाजू आणि 180 डिग्री म्हणजे खाली. अशा रीतीने प्रत्येक अॅरो  की दाबल्यावर कार्टून चे तोंड त्या दिशेने फिरवले गेले आहे . त्यानंतर चा change x by हा ब्लॉक कार्टून ला 4 pixel इतके अंतर चालवतो.  4 मुळे तो उजवीकडे सरकवला जातो आणि -4 मुळे तो डावीकडे हलतो.
तसेच change y by या ब्लॉक मुळे कार्टून वर आणि खाली सरकतो. 4 मुळे तो वर सरकतो, आणि -4 मुळे तो खाली येतो.

स्क्रॅच  मध्ये वापरले जाणारे अँगल समजण्यासाठी तुम्हाला खालील चित्राचा उपयोग होईल.

टिप्पण्या