HTML मधील स्टाइल्स

HTML मध्ये style स्टाइल या अॅट्रीब्युटचा वापर करून अक्षरांचा रंग, बैकग्राउंड कलर, वेगवेगळे फॉन्ट्स, त्यांचा आकार, अणि त्यांची अलाइनमेंट ठरवता येते.

HTML background color

HTML मध्ये style समोर background-color लिहून त्यासमोर हव्या त्या रंगाचे नाव लिहिल्यास, वेबपेज त्या रंगाचा बनतो. HTML मध्ये 140 रंगांची नावे लिहिता येतात. ही नावे तुम्ही खालील पानावर पाहू शकता.



वर लिहिलेल्या कोड नंतर वेब पेज चा रंग खालील प्रमाणे दिसतो.


HTML Text color


HTML मध्ये अक्षरांचा रंग बदलण्यासाठी style अॅट्रीब्युट मध्ये color या प्रॉपर्टीचा उपयोग केला जातो.

वरील कोड मध्ये लिहिल्या प्रमाणे h1 चा रंग निळा तर पॅराग्राफ लाल रंगात दिसतो.




HTML Fonts

HTML मध्ये style अॅट्रीब्युट मध्ये font-family या प्रोपर्टीचा उपयोग केल्यास वेगवेगळी फॉंट्स निवडता येतात. खालील उदाहरणात Mangal आणि Nirmala UI या दोन फोन्टस चा वापर केला गेला आहे. 



HTML Text size


HTML मध्ये style अॅट्रीब्युट मध्ये font-size या प्रोपर्टीचा उपयोग केल्यास फॉंट्सचा आकार लहान किंवा मोठा करता येतो.खालील उदाहरणा मध्ये h1 चा आकार 300% तर पॅराग्राफ 160% ने वाढवला आहे.




HTML Text Alignment

HTML मधील style अॅट्रीब्युट मध्ये text-align या प्रॉपर्टीचा उपयोग करून  अक्षरांची अलाइनमेंट ठरवता येते. यामध्ये left, right आणि center हे तीन पर्याय आहेत.


या उदाहरणा मध्ये h1 हेडर मधील टेक्स्ट हे center ला अलाइन केलेले आहे.










टिप्पण्या