HTML चे एलिमेंट्स आणि अॅट्रीब्युट्स

HTML एलिमेंट्स 

HTML Elements म्हणजे काय. आपण आतापर्यंत हे पाहिले कि HTML मध्ये टॅग चा वापर केला जातो. आणि दोन टॅग मध्ये काही लिहिले जाते. तर हे दोन टॅग आणि त्यामधील अक्षरे मिळून एक एलीमेंट म्हंटला जातो. म्हणजे हेड एलिमेंट, बॉडी एलिमेंट, पॅराग्राफ एलिमेंट वगैरे. तर या प्रत्येक एलिमेंटचे वेगवेगळे गुणधर्म असतात, त्यांना अॅट्रीब्युट्स म्हणतात. ते कोणते हे आपण आता पाहू.

The lang attribute

तुमच्या वेबसाईटची भाषा कुठली हे तुम्हाला html टॅग मध्ये नमूद करता येते. यासाठी lang अॅट्रीब्युटचा वापर केला जातो. मराठी साठी mr हा कोड वापरता येतो.




The title attribute.

HTML मधील एलिमेंट्सला टायटल देता येते. उदाहरणार्थ जर p या पॅराग्राफ च्या टॅग मध्ये आपण title लिहून त्यासमोर जे काही लिहू ते त्या  पॅराग्राफ वर माउस पॉइंटर नेल्यास एका टूल टिप मध्ये दिसून येते.



वर title समोर जे लिहिलेले आहे ते खाली वेब पेज वर दिसणाऱ्या पॅराग्राफ वर माउस पॉइंटर नेल्यास त्याजागी दिसून येत आहे.



The href attribute

HTML मध्ये a आणि /a या दोन टॅग पासून लिंक हा एलिमेंट बनतो. तर href हा त्याचा अॅट्रीब्युट आहे. href हे कदाचित hypertext reference चे शोर्ट फॉर्म आहे.


The Size attribute


HTML मध्ये एखाद्या एलिमेंट मध्ये जर एखादे चित्र किंवा व्हिडीओ दाखवायचा असेल तर तो ज्या आकाराचा दाखवायचा ते ठरवता येते. आकार ठरवताना त्याची रुंदी आणि उंची लिहावी लागते. उदाहणार्थ खालील कोड मध्ये Width आणि Height लिहून चित्राचा आकार दर्शवला आहे. हा आकार चित्राच्या मूळ आकारापेक्षा वेगळा म्हणजे लहान किंवा मोठा असू शकतो. चित्र ज्या आकाराचे आहे ते तसेच दाखवायचे असेल तर width आणि height वेगळे लिहिण्याची गरज नसते.



The Alt attribute

वरील चित्रामध्ये alt या अॅट्रीब्युट चा वाप्र्र केला गेला आहे. यामुळे एखाद्या वेळी जर चित्र वेब पेज वर दिसत नसेल तर चित्राच्या जागी आपण alt समोर लिहिलेली अक्षरे दिसतात.


टिप्पण्या