स्क्रॅच प्रोग्रामिंग ट्युटोरिअल्स - part 2


आज आपण स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटर मध्ये एक छोटासा प्रोग्राम बनवून पाहू. आपल्याला वरील चित्रामध्ये स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटर दिसतो. आपण याचा वापर ऑनलाइन किंवा ऑफलाईन देखील करू शकतो.

स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपल्याला कार्टून दिसतात आणि उजव्या बाजूला प्रोग्रामचा कोड दिसतो. मधल्या भागामध्ये कोडचे ब्लॉक्स आहेत ज्यांना आपण माउस पॉइंटर ने निवडून उजव्या बाजूला नेवू शकतो.



मध्यभागात स्क्रिप्ट्स आहेत जे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागलेले आहेत. जसे Motion, Looks, Sound, Events, Control इत्यादी.

 कुठल्याही कॅटेगरीला निवल्यानंतर त्यातले कोड ब्लॉक्स दिसू लागतात.  

स्क्रीनच्या डाव्या भागात जे कार्टून दिसतात त्यांना स्प्राईट म्हंटले जाते. स्क्रॅचमध्ये खालील बाजूला  "New Sprite" असे लिहिलेले आहे. त्या समोर चार छोटे आइकॉन दिसतात.



यापैकी पहिल्या आइकॉनवर क्लिक केल्यानंतर स्क्रॅचची स्प्राईट लाइब्रेरी उघडते. म्हणजे कार्टून चित्रांची लायब्ररी. तेथे कुठलाही कार्टून निवडल्यास तो स्क्रीनच्या डाव्या भागात दिसू लागतो. 

स्क्रीनवर जे कार्टून आहेत त्यांचे एक छोटे थम्बनेल खालील भागात दिसते. येथे तुम्ही जो थम्बनेल निवडाल त्यासाठी प्रोग्रामिंग करता येते.  येथे आपल्याला प्रत्येक कार्टून चित्रासाठी वेगळी प्रोग्रामिंग करावी लागते.

New Sprite - समोर जो दुसरा आइकॉन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक इमेज एडिटर उघडतो,  त्यामध्ये हवे असेल तर एखादे कार्टून स्वतः काढू शकता. 

तिसऱ्या आइकॉनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर वरून एखादा फोटो किंवा चित्र अपलोड करू शकता.

चौथ्या आइकॉनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या  कम्प्युटरला जोडलेल्या कॅमेऱ्याचा वापर करून काढलेला फोटो स्प्राईट म्हणून वापरू शकता.

स्क्रिप्ट्सच्या वेगवेगळ्या कॅटेगरी  मधील ब्लॉक्स निवडून त्यापासून एक प्रोग्राम कसा बनवला जातो ते तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

टिप्पण्या