स्क्रॅच प्रोग्रामिंग ट्युटोरिअल्स - part 1


आज आपण स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटर बद्दल माहिती घेऊ. आठ वर्षावरील मुलांसाठी उपयुक्त असा हा प्रोग्रामिंग लँगवेज आहे.  लहान मुलांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी बनवल्या गेलेल्या या लँगवेज साठी एक ऑनलाईन तसेच ऑफ लाईन एडिटर उपलब्ध आहे.


खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हे वेब साईट उघडा.
https://scratch.mit.edu/

या वेबसाईट वर तुम्ही स्वतः चे एक अकाउंट उघडा. असे केल्यास ऑनलाईन एडिटर मध्ये तुम्ही जी प्रोग्रामिंग कराल ते सर्व सेव्ह करून ठेवले जातील.
एडिटर उघडण्यासाठी वरील पानावर "Create" या लिंक वर क्लिक करा. असे केल्यास खालील चित्रात दिसत असलेले एडिटर उघडेल.

या ठिकाणी केलेले प्रोग्राम्स तुम्ही ऑनलाईन सेव्ह करून ठेऊ शकता. 
त्याच बरोबर जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर वर इंस्टाल करता येण्याजोगा एडिटर पाहिजे असेल तर तो तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.


तर तुम्हाला स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटर कसा इंस्टाल करावा किंवा ऑनलाईन उघडावा याची माहिती मिळाली. यापुढे आपण या एडिटर बद्दल माहिती घेऊ.


टिप्पण्या