स्क्रॅच प्रोग्रामिंग ट्युटोरिअल - एनलार्ज आणि कलर चेंज आज आपण स्क्रॅच एडिटर वापरून एक सोपा आणि मजेदार प्रोग्राम बनवू. जेव्हा आपण स्क्रॅच एडिटर 
उघडतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला एक मांजराचे चित्र दिसते. याला स्प्राईट असे म्हंटले जाते. आणि हे चित्र एडिटरच्या ज्या भागात दिसते त्याला स्टेज म्हणतात. 
स्टेज च्या खालील बाजूला स्प्राईटचे थंबनेल म्हणजे छोटी चित्रे दिसतात. त्यासमोर "New Sprite" लिहिलेले आहे. तसेच चार छोटी छोटी आईकॉन्स दिसतात. त्यापैकी पहिल्या आईकॉन वर क्लिक स्प्राईट लायब्ररी उघडते.

 

या लायब्ररी मधून तुम्हाला हवे ते चित्र निवडू शकता. येथे मी एक बॉल निवडला आहे. चित्र निवडून Ok बटन दाबा म्हणजे ते चित्र स्टेजच्या मध्यभागी दिसू लागते. माउस पॉइंटर वापरून ही चित्रे स्टेज मध्ये इकडे तिकडे सरकवून ठेवता येतात. आता तुम्ही निवडलेल्या स्प्राईट च्या थंबनेल वर एकदा क्लिक करा म्हणजे ते सेलेक्ट होईल. आता तुम्ही जे कोड ब्लॉक निवडाल ते या स्प्राईट वर काम करतील. स्क्रॅच मध्ये आपल्याला प्रत्येक स्प्राईट साठी वेगळे कोड वापरावे लागते.
स्क्रीनच्या मध्य भागात स्क्रिप्टचे पॅनल आहे. त्यामध्ये "Looks" वर क्लिक करा, म्हणजे नारंगी रंगाचे कोड ब्लॉक्स दिसू लागतील. त्यामधून वर दाखवलेले दोन कोड ब्लॉक्स निवडून उजव्या बाजूला नेवून ठेवा. 

त्यानंतर स्क्रिप्ट्स मधून "Events" निवडा, असे केल्यास ब्राऊन/ तपकिरी रंगाचे कोड ब्लॉक्स दिसू लागतील. त्यामधून वर दाखवलेले ब्लॉक निवडून वर दाखवल्याप्रमाणे त्यांची मांडणी करा.

यानंतर जेव्हा तुम्ही स्टेज मध्ये बॉल वर क्लिक कराल तेव्हा बॉलचा आकार आणि रंग बदलेले दिसेल. हे कसे होते ते तुम्ही खालील व्हिडिओ मध्ये पाहू शकता. 


टिप्पण्या