मुलांसाठी प्रोग्रामिंग - लाइट बॉट प्रोग्रामिंग अवर


आज आपण lightbot.com या वेबसाईटबद्दल माहिती घेऊ. लहान मुलांना अॅनिमेटेड गेम्सच्या माध्यमातून प्रोग्रामिंगचे बेसिक्स शिकविणारी ही वेबसाईट आहे. त्यांचे सॉफ्टवेअर कमर्शिअल आहे. पण त्याचा सुरवातीचा काही भाग ते विनामूल्य वापरू देतात. त्यासाठी त्यांनी "Lightbot-hour of code" या नावाने अॅप बनवला आहे तो तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर इंस्टॉल करू शकता. 

तसेच तुम्ही हा गेम कॉम्प्युटरच्या ब्राउजर मध्ये देखील खेळू शकता. त्याचे लिंक मी खाली देत आहे. 

यामध्ये तुम्हाला बेसिक्स, प्रोसिजर्स आणि लूप्स या तीन विभागातील गेम्स खेळता येतात. 
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या कमांडच्या बटणावर क्लिक केल्यास ते मेन विंडोमध्ये दिसू लागतात. एखादे कमांड डिलीट करण्यासाठी त्यावर एकदा क्लिक करावे. कमांड लिहून झाल्यास हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे म्हणजे प्रोग्राम रन होतो.
या खेळामध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईल्स मांडून ठेवलेले दिसतात त्यामध्ये काही निळ्या रंगाचे असतात, आणि लाईट बॉट हा एक अॅनिमेटेड कॅरेक्टर आहे. त्याला निळ्या रंगाच्या टाईल पर्यंत पोहोचवायचे असते आणि त्या टाईलला प्रकाशित करायचे असते. सारे टाईल्स प्रकाशित झाल्यावर लेवेल पूर्ण होतो. हा गेम कसा खेळावा हे दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.टिप्पण्या