मुलांसाठी प्रोग्रामिंग - kodable.com सोबत प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स

या लेखामध्ये आणि यापुढील लेखांमध्ये मी तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल माहिती देईन. प्रोग्रामिंगचे  कन्सेप्ट्स शिकण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकण्याची आवश्यकता नाही. 
बरेचसे वेबसाईट आणि सॉफ्टवेअर आहेत जे लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग चे कन्सेप्ट्स शिकवणारे गेम्स बनवतात. यामध्ये बरेचसे कमर्शिअल असून त्यांचे डेमो व्हर्जन उपलब्ध आहेत, तर बरेचसे सॉफ्टवेअर आणि  वेबसाईट्स बिलकुल विनामूल्य आहेत. आपण या सर्वांची माहिती घेऊ


जर तुम्ही आठ ते सोळा वर्षे वयोगटात आहात आणि जर तुमच्या शाळेमध्ये प्रोग्रामिंग बद्दल तुम्हाला शिकवले गेले नसेल तर हे गेम्स खेळून तुम्ही प्रोग्रामिंग च्या कन्सेप्ट्स बद्दल बरीचशी माहिती मिळवू शकता. हे त्या सर्वांसाठी उपयोगी आहे ज्यांनी प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेतले नाही पण ज्यांना प्रोग्रामिंग बद्दल कुतूहल आहे. 

आपण सोप्या गोष्टींपासून सुरवात करू आणि नंतर प्रोग्रामिंग लैंग्वेजेस चा सविस्तर अभ्यास करू .

आज आपण kodable.com या वेबसाईटची माहिती घेऊ. जर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कराल तर त्या पानावरून तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरवर हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता. विंडोजसाठी  हे 110 MB चे डाऊनलोड आहे. याला डाऊनलोड आणि इंस्टाल करा आणि त्याला रन करा.
 https://www.kodable.com/download 


ओपनिंग स्क्रीन तुम्हाला एक प्रोफाइल बनवावे लागेल.  येथे तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड तयार करावा लागेल. तुम्ही एका कॉम्प्युटरवर एका पेक्षा जास्त प्रोफाइल देखील बनवू शकता.  यामध्ये दोन कॅटेगरी मध्ये सात सेक्शन आणि प्रत्येक सेक्शन मध्ये पाच लेवल आहेत,  तुम्ही एकूण 35 लेवल या फ्री व्हर्जन मध्ये खेळू शकता. 

मी या प्रोग्रामचा वापर कसा करावा हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.या पुढील आर्टिकल्स -

टिप्पण्या