मुलांसाठी प्रोग्रामिंग - Code.org मधील प्रोग्रामिंग कोर्सेस


आज आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियो बद्दल माहिती घेऊ. लहान मुलांना अॅनीमेटेड चित्रांच्या माध्यमातून प्रोग्रामिंगचे बेसिक्स शिकवण्यासाठी ही वेबसाईट बनवली गेली आहे. या वेबसाईट वरील सर्व साहित्य विनामूल्य आहे.


या वेबसाईटचा वापर करण्यासाठी तुम्हाला साईन अप करावे लागेल. म्हणजे एक अकाउंट उघडावे लागेल. जर तुमचे गुगल किंवा फेसबुकचे अकाउंट असेल तर त्याचे लॉग इन तुम्ही या साईटसाठी वापरू शकता.

कोड स्टूडियो आणि अवर ऑफ कोड या नावाने तुम्हाला बरेचसे कोडिंग एक्सरसाइजेस दिसतील. आपण त्यापैकी कोड स्टूडियो मधील कोर्सेस बद्दल माहिती घेऊ.

यामध्ये चार कोर्सेस आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी हे कोर्सेस बनवले गेले आहेत. आपण त्यापैकी प्रत्येक कोर्सबद्दल सविस्तर माहिती घेऊ. या वेबसाईटबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे  तो तुम्ही खाली पाहू शकता.

    

या मालिकेतील इतर आर्टिकल्स 

टिप्पण्या