लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 2 # Artist Loops

या लेखामधे आपण Code.org Code studio च्या पहिल्या कोर्सच्या अठराव्या आणि शेवटच्या स्टेजबद्दल माहिती घेऊ. तुम्ही जर या वेबसाईटवर अकाउंट उघडला असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही या स्टेजला सुरवात करू शकता.   


https://studio.code.org/s/course1/stage/18/puzzle/1

यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग लूप्सचा वापर करून ड्रॉइंग काढता येते. 
आपल्याला येथे लूप्सचा वापर करावयाचा असतो. येथे गुलाबी रंगाचे एक ब्लॉक आहे. त्यावर repeat लिहिलेले आहे. आणि निळ्या रंगाचे चार ब्लॉक्स आहेत. त्यावर चार दिशांकडे दाखवणारे चार बाण आहेत. repeat ब्लॉक मध्ये एक ड्रॉप डाउन मेनू आहे, त्यामध्ये आपण लूपसाठी एखादा अंक निवडू शकतो.
डाव्या बाजूच्या कार्टून मध्ये पेन्सील हातात धरलेला एक मुलगा दिसतो. त्याच्या समोर एक रेषा आहे. या रेषेचे चार भाग आहेत.
आपल्याला या चित्राला उजवीकडे चार वेळा सरकवायचे असते. असे केल्यानंतर तेथे गडद रंगाची रेषा निर्माण होते. यासाठी राईट अॅरो चा वापर करता येतो.
येथे भगव्या रंगाचा एक ब्लॉक दिसतो. त्यावर "when run " लिहिलेले आहे. त्याखाली जे ब्लॉक्स ठेवाल ते "run" बटन दाबल्यावर एक्झिक्युट होतात. 
येथे आपण चार वेळा राईट अॅरो वापरू शकतो किंवा repeat ब्लॉक वापरून त्यामध्ये चार हा आकडा निवडून त्यामध्ये राईट अॅरोचा ब्लॉक  ठेवल्यास तो कमांड चार वेळा एक्झिक्युट होतो. यालाच लूप म्हणतात.
"एखादा प्रोग्रामिंग कमांड एकापेक्षा अधिक वेळा एक्झिक्युट करण्यासाठी लूप स्ट्रक्चर चा वापर होतो. यामुळे प्रोग्रामची लांबी कमी होते "
या लेवलमध्ये आपल्याला एका खाली एक सहा रेषा ओढायच्या आहेत.  त्यासाठी एकदा राईट, एकदा लेफ्ट आणि एक जंप असे तीन ब्लॉक्स आपण वापरू. गुलाबी ब्लॉक मध्ये सहा हा अंक निवडा आणि हे तीन निळे ब्लॉक्स त्यामध्ये ठेवा. रन बटन दाबल्यावर आपल्याला या सहा रेषा निर्माण झालेल्या दिसतील. 


या लेवल मध्ये आपल्याला वरील चित्राचा उरलेला भाग पूर्ण करायचा आहे. उजवा, वर, उजवा, वर असे चार वेळा रेषा ओढल्यास एक सिक़्वेन्स पूर्ण होते. आपण हे सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करू. गुलाबी ब्लॉकमध्ये तीन हा अंक निवडा, आणि त्यामध्ये वरील प्रमाणे चार निळे ब्लॉक्स ठेवा. रन बटन दाबल्यावर वरील चित्र पूर्ण झालेले दिसून येईल. 
या लेवलमध्ये आपल्याला वरून खाली येत चार पायऱ्या काढायच्या आहेत.  एकदा डावीकडे आणि एकदा खाली येवून आपण एक पायरी काढू शकतो. जर ही सिक़्वेन्स चार वेळा रिपीट केली तर चार पायऱ्या काढल्या जातील. आपण repeat ब्लॉकमध्ये चार हा आकडा निवडू आणि त्यामध्ये वरील प्रमाणे दोन निळे ब्लॉक्स ठेऊ. रन बटन दाबल्यावर चार पायऱ्या काढल्या गेलेल्या दिसतील. 


यामध्ये वर जात तीन पायऱ्या आणि खाली येत तीन पायऱ्या काढायच्या आहेत. त्यासाठी आपण दोन रिपीट ब्लॉक्स वापरू. आणि त्यामध्ये वर दाखवल्याप्रमाणे दोन दोन निळे ब्लॉक्स ठेऊ. रन बटन दाबल्यावर सहा पायऱ्या तयार झालेल्या दिसतील.

या लेवल मध्ये आपल्याला फिकट रंगात दिसणाऱ्या रेषा काढायच्या आहेत. उजवीकडे जाताना एक राईट ब्लॉक आणि एक राईट जंप असे दोन  ब्लॉक निवडू. ही सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करू. तसेच खाली येताना एक डाऊन ब्लॉक आणि एक डाऊन जंप ही सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करू.


या लेवल मध्ये वर जाणाऱ्या तीन पायऱ्या काढायच्या आहेत. एक अप, आणि दोन राईट ब्लॉक वापरल्यास एक पायरी पूर्ण होते. ही सिक़्वेन्स तीन वेळा रिपीट करा. 


या लेवल मध्ये खाली येत असताना चार पायऱ्या काढायच्या आहेत. एक राईट आणि एक डाऊन ब्लॉक वापरून आपण एक पायरी बनवू शकतो. ही सिक़्वेन्स चार वेळा रिपीट करा.  या लेवल मध्ये आपल्याला रिकाम्या कॅनव्हास वर पाहिजे ते चित्र काढण्याची मुभा आहे. मध्यभागातील ब्लॉक्स उजवीकडे नेऊन तुम्ही स्केचसाठीचे प्रोगामिंग करू शकता. यामध्ये आपल्याला सर्वात खाली  'set color' नावाचा ब्लॉक दिसतो. यामध्ये वेगवेगळे रंग निवडता येतात. हा ब्लॉक वापरल्यास त्याखाली काढलेल्या सर्व रेषा त्या रंगाच्या होतात.  

या ठिकाणी Code.org या वेब साईटवरील पहिला कोर्स पूर्ण होतो. यानंतर आपण दुसऱ्या कोर्सची सुरवात करू.
टिप्पण्या